कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कुंदे येथे काजू पीक शेतीशाळा संपन्न

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-०३:-** महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ कृषि विभागाचे तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांचे मार्फत कुंदे भटवाडी येथे शनिवार दिनांक २३ डिसेंबर, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता काजू पिकाच्या शेतीशाळा व प्रक्षेत्र दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित काजू बागायतदार शेतकर्‍यांना प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत कार्यरत कीटक शास्त्रज्ञ विजयकुमार देसाई यांनी काजूची लागवड, एकात्मिक खत व्यवस्थापन, प्रमुख किड- रोगांची ओळख व त्यांचे नियंत्रण याबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रक्षेत्र दिनाचे औचित्य साधून शेतकर्‍यांना काजू बागेतील किड व रोगांचे निरीक्षणे कशी घ्यावीत, त्यांची लक्षणे कोणती यासंदर्भात प्रात्यक्षिक संशोधन सहयोगी डॉ. गोपाळ गोळवणकर यांनी करून दाखविले.

सदर शेतीशाळेस कुडाळ तालुक्यातील कुंदे या गावातील कृषि पर्यवेक्षक श्री. ए. टी. परब, कृषि सहाय्यक श्री. साईनाथ तांबोळी यांच्यासमवेत एकूण २५ शेतकरी उपस्थित होते. कृषि सहाय्यक श्री. साईनाथ तांबोळी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन केले. तसेच त्यांनी नवीन आर्थिक वर्षातील कृषि विभागाच्या विविध शासकीय योजनांबाबत माहिती देऊन शेतकर्‍यांना त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कृषि पर्यवेक्षक श्री. ए. टी. परब यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) या योजनेबाबत माहिती देऊन शेतकर्‍यांना त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन करून आभार प्रदर्शन केले. शेतीशाळेला उपस्थित शेतकऱ्यांनी प्रक्षेत्र भेटीदरम्यान काजू बागेत भेडसावणर्‍या समस्या व प्रश्न विचारून त्यावर सखोल चर्चा करण्यात आली व काजू पीक संरक्षणासाठी लघु मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*

 

*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*

_(चॉकलेट फॅक्टरी)_

 

*♦️उपलब्ध उत्पादने:-*

मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट

ड्रायफुट कोटिंग चॉकलेट

कस्टमाईज चॉकलेट

फिलिंग चॉकलेट

 

*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*

🔸फेस्टिव्हल कलेक्शन

🔸किड्स कलेक्शन

🔸स्पेशल चॉकलेट बुके

 

*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*

▫️आईसकेक

▫️पेस्ट्रीसकेक

▫️जार केक

▫️रोल केक

▫️फ्लेवर्ड केक

▫️चॉकलेट केक

 

*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*

 

*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*

 

*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*

 

*🫖विन तंदूर चहा☕*

डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !

 

*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*

 

 

*🎴संपर्क व पत्ता :-*

*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*

_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_

_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_

 

9920057769

9422054871

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!