🟥 कुडाळ तालुक्यातील काजू उत्पादकांना प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०३:-* महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील डॉ. विजयकुमार देसाई (कीटकशास्त्राचे शास्त्रज्ञ व हॉर्टसॅप प्रकल्प समन्वयक) व डॉ. गोपाळ गोळवणकर (संशोधन सहयोगी) यांनी महाराष्ट्र शासनाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषि विभागाचे श्रीमती. गायत्री तेली मंडल कृषि अधिकारी (माणगाव), पर्यवेक्षक श्री. ए. टी. परब (कडावल २), श्रीमती. एस. एस. परब (कडावल १), श्रीमती. गीतांजली परब (माणगाव), कृषि सहाय्यक श्री. साईनाथ तांबोळी, श्री. दिपक गावीत, श्री. धनंजय कदम, श्री. प्रशांत कुडतरकर व कृषि मित्र श्री. सुनील पवार यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यातील कुंदे, पोखरण, हिर्लोक, गोठोस व माणगव या कार्यक्षेत्रातील हे सर्व कर्मचारी उपस्थित होते. सदर गावांमध्ये हॉर्टसॅप योजनेअंतर्गत एकूण ३६ काजू उत्पादक शेतकर्यांच्या उपस्थितीत काजूच्या एकूण १५ बागांचे सर्वेक्षण करण्यात आले.
निवडलेल्या गावातील काजूच्या बागांच्या पाहणीदरम्यान बर्याच बागा या पालवी व मोहोरलेल्या अवस्थेत व स्वच्छ असल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या बागांमध्ये टी मॉस्किटो बग (ढेकण्या) व फुलकिडी यांचे प्रमाण नगण्य असल्याचे निदर्शनास आले. कारण बर्याच शेतकर्यांनी त्यांच्या बागेत योग्यवेळी फवारणी केल्याचे निदर्शनास आले. या सर्वेक्षण व मार्गदर्शन मोहिमेत काजू बागांची पाहणी करून शास्त्रज्ञांनी कृषि विभागाच्या अधिकारी वर्गाच्या किड व रोग सर्वेक्षण व मार्गदर्शनादरम्यान येणार्या अडचणी व त्यावरील उपाययोजना तसेच किड व रोगाच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी सविस्तर मार्गदर्शन करून शेतकर्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. या भेटीदरम्यान कृषि विभागाच्या अधिकारी वर्ग व शेतकर्यांना काजू पीक संरक्षणासाठी लघु मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. सदर मोहीम ही प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला सहयोगी संशोधक संचालक डॉ. राजन खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

