कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

नेमळेतील विद्यार्थी मारहाण प्रकरणी चौकशी समिती गठीत

नेमळेतील विद्यार्थी मारहाण प्रकरणी चौकशी समिती गठीत

दोन दिवसात अहवाल मिळणार..
योग्य ती कारवाई करण्याचे शिक्षणाधिकारी यांचे संकेत.

सावंतवाडी तालुक्यातील नेमळे हायस्कूल मधील एका विद्यार्थ्याला एका शिक्षकाने तो विद्यार्थी इतर मुलांसोबत सभागृहात गेला म्हणून लाकडी रिपेने मारहाण केल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांनी चौकशी समिती नेमली असून ही चौकशी समिती आपला अहवाल दोन दिवसात शिक्षणाधिकारी यांना सादर करणार आहे त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
काही दिवसापूर्वी नेमळे हायस्कूलमध्ये विद्यार्थी शाळेच्या हॉलमध्ये जमा झाले होते, तुम्ही या ठिकाणी का आलात अशी विचारणा करीत तेथील एका शिक्षकाने एका विद्यार्थ्याला पकडून बेदम महाराण केली या महाराणीत त्या विद्यार्थ्याला सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करावे लागले व त्याच्यावर उपचार करण्यात आले मात्र नंतर हे प्रकरण सामोपचराने मिटविण्यात आले.
मात्र या प्रकरणाचा पोलखोल कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल करताच जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले, त्यांनी याबाबत मांजरेकर मॅडमच्या अखत्यारीत चौकशी समिती नेमली असून ती चौकशी समिती दोन दिवसात आपला अहवाल शिक्षणाधिकारी यांना देणार आहे, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असे शिक्षणाधिकारी यांनी स्पष्ट केले.
सदरचे प्रकरण अंगलट येते असे दिसतात त्या शिक्षकाने गाव पुढाऱ्यांच्या मदतीने त्या मुलाच्या आई वडीलांना गाठून त्यांच्या हाता पाया पडून प्रकरण मिटवले होते, मात्र याबाबतची माहिती ग्रामस्थांनी कोकण लाईव्ह न्युज चॅनलला देताच कोकण लाईव्ह न्यूज चॅनलने यावर प्रकाश टाकला व शिक्षकावर कारवाईची मागणी केली, त्यानंतर जिल्हा शिक्षण विभाग खडबडून जागा झाला व या संपूर्ण प्रकारची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!