कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मोती तलावाच्या काठावर ३०ते ३१डिसेंबर रोजी खाऊ गल्ली महोत्सव

सावंतवाडी : मनोरंजनानंतर खवय्यांनी चमचमीत पदार्थांची मेजवानी घेऊन येत आहे रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी. रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आयोजित व दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत “खाऊ गल्ली” महोत्सव येत्या ३० व ३१ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे हा महोत्सव होणार आहे. यावेळी खवय्यांनी चमचमीत पदार्थांवर ताव मारण्यासाठी खाऊ गल्ली महोत्सवात उपस्थित राहत खमंग, रूचकर अन् चटकदार पदार्थांची चव चाखावी असं आवाहन रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी, दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांच्याकडून करण्यात आल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!