हनुमंत गडावरून आलेल्या शिवरथ यात्रेचे सावंतवाडीत युवराज लखम राजे भोसले यांनी केले स्वागत
हनुमंत गडावरून आलेल्या शिवरथ यात्रेचे सावंतवाडीत युवराज लखम राजे भोसले यांनी केले स्वागत
हनुमंत गड जतन व संवर्धन साठी सावंतवाडीत शिवरथ यात्रा हनुमंत गडावरून काढण्यात आली तीचे स्वागत सावंतवाडी संस्थानचे राजे युवराज लखम राजे भोसले व श्रध्दाराणी भोसले यांनी केले,शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.
हनुमंत गडावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे, त्यानिमित्ताने जनजागृती व्हावी यासाठी या चित्ररथाचे आयोजन करण्यात आले होते, सावंतवाडी शहरातून ही रॅली काढण्यात आली नंतर ती कुडाळकडे रवाना झाली,यावेळी साहेबांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रेमानंद देसाई, डॉ सोनल लेले व त्यांच्या सहकारी,प्रा गोवेकर ॲड राहुल गायकवाड,मराठा समाजाचे सावंतवाडी अध्यक्ष सीताराम गावडे,व कार्यकर्ते उपस्थित होते.

