🟥वीज कनेक्शन नवीन नावावर करणे झाले सोपे
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२२:*
एखादे जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर त्यांचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून होता. नव्या मालकाच्या नावावर होण्यासाठीची ग्राहकांची धावपळ बंद झाली आहे. आता आपोआप कनेक्शनधारकाच्या बदल होण्यासाठी महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन व्यवस्था नुकतीच सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ईज ऑफ लिव्हिंगच्या सूचनेनुसार हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असल्याचे महावितरणने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
एखाद्याने जुने घर किंवा दुकान खरेदी केले आणि त्यानुसार मुद्रांक शुल्क भरून संबंधित विभागाकडे नोंदणी केली, की त्यानंतर त्या घराचे किंवा दुकानाचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून आपल्या नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत होता. या बदलासाठी महावितरणकडे अर्ज व सोबत कागदपत्रे दाखल करून प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पडताळणी केली जात असे. महावितरणने यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध केली आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज भरून संबंधित कागदपत्रे अपलोड करता येतात. परंतु, या प्रक्रियेत कागदपत्रांच्या पडताळणीत वेळ जात होता. ग्राहकांना अनेकदा पाठपुरावा करावा लागत होता.
नव्या व्यवस्थेनुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची आयटी सिस्टिम जोडली आहे. नोंदणी विभागात नव्या मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण झाली की, महावितरणला संदेश पाठविला जातो, त्यानुसार महावितरणकडून संबंधित ग्राहकाला एसएमएस पाठवून आवश्यक प्रक्रिया
शुल्क भरण्यास कळविले जाते. हे शुल्क’ ग्राहक ऑनलाईनही भरू शकतो. फी भरली की विजेचे कनेक्शन नावावर होते आणि पुढच्या महिन्याचे विजेचे बिल नव्या मालकाच्या नावाने पाठविले जाते. एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे घराची खरेदी झाली असेल, तर त्यांच्याशी संपर्क साधून कोणाच्या नावे वीज कनेक्शन ट्रान्स्फर करायचे, याची निवड करण्यास सांगितले जाते. कारण विजेचे कनेक्शन एकच व्यक्ती किंवा संस्थेच्या नावे असू शकते. नव्या प्रक्रियेत वीज कनेक्शन नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करणे, कागदपत्रे दाखल करणे, पडताळणी करणे व पाठपुरावा करणे हे सर्व कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे,
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣*
*महागाईने त्रस्त..!🤒 इथे सर्व स्वस्त..!🤩*
_🏠गृहउपयोगी वस्तुंचा खजिना…🎁_
*ज्या वस्तूंची किंमत बाजारात 100/- ते 250/- रू. पर्यंत आहे त्या वस्तु फक्त 40/-हून अधिक*
_कोणतीही वस्तू…🥳हजारो व्हरायटीज🤩_
पुजा सामान, किचन वेअर, क्लिनिंग किट, टॉईज, सॅनेटरी वेअर, गिफ्ट आयईटमस्, एअरटाइट कंटेनर, डोअर मॅट, ऑफिस आईटमस्, प्लास्टिक नॉव्हेल्टीज, स्टेनलेस-स्टीलच्या वस्तू, मेलामाईन/चायना प्लेट
*📦वस्तूंचा उत्तम दर्जा, कमी किंमतीत हेच आमचे ध्येय…💰*
_फक्त काही दिवसांकरिता_
*🥳सुपर सेल🥳*
*🎴पत्ता:-* सार्वजनिक गणेश हॉल, जून्या पंचायत समिती शेजारी, सालईवाडा, सावंतवाडी.
*⏰वेळ:-* सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत
*📌टिप:-* कृपया प्रदर्शनाला भेट देतेवेळी कॅरी बॅग आणावी.
___________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

