ओसरगाव टोलनाक्याजवळ लक्झरीने घेतला पेट
*ओसरगाव टोलनाक्याजवळ लक्झरीने घेतला पेट*
*लक्झरी मधील सर्व प्रवासी सुखरूप*
कणकवली (प्रथमेश जाधव)
ओसरगाव टोल नाक्याजवळ आज सकाळी 6 वा. दरम्यान पुण्याहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या केळकर ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी ला आग लागून लक्झरी पूर्णता जळून खाक झाली. ही आग शॉर्टसर्किटने लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या लक्झरी मधून 35 प्रवासी प्रवास करत होते. मात्र सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले . घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्यासह पोलीस
कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. व मदत कार्य केले. तसेच कणकवली नगरपंचायतच्या अग्निशमन बंबाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

