सावंतवाडी येथे हातमाग व यंत्रमाग कापड प्रदर्शन व विक्री केंद्राचे उदाघाटन संपन्न
सावंतवाडी,लग्नसराई व नाताळ सणानिमित सोलपूर येथील भाऊराया हॅन्डलूम यांचे हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन सावंतवाडी येथे नुकतेच करण्यात आले. शहरातील देव नारायण मंदीर पहिला मजला मोती तलाव समोर जेस्ट नागरिक किरन हेगडे याच्या हस्ते दिप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले दि. 10/12/2022 ते 31/12/2022 पर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे हातमाग विणकाम करून तयार केलेले कापड अत्यंत चांगल्या दर्जाचे असले त्यामुळे हात माग कापड प्रदर्शनाचा सावंतवाडी करांनी लाभ घ्यावा असे। आवाहन हातमाग कापड प्रदर्शनाचे प्रमुख पांडुरंग पोतन यांनी केले ते पुढे म्हणाले भारतीय संस्कृतीच्या प्रसारा साठी व हातमागाच्या प्रचारा साठी आम्ही सातल्याने प्रयत्न करत आहोत हातमागावर विणकाम करून वापरण्या योग्य कापड तयार केले जाते या कापड च्या वापरामुळे कोणत्याही प्रकारचा त्वचारोग होत नाही मात्र हे कापड तयार करण्या साठी मनुष्यबळ अधिक लागत असल्याने व विक्री दरापेक्षा उत्पादन खर्च जास्त असल्याने सध्या हातमाग कापडाची निर्मिती कमी प्रमाणे होत आहे त्यामुळे या व्यवसाया मध्ये आमची ही नवी पिढी समोर येत नसल्याची खंत व्यक्त केली या प्रदर्शना प्रसंगी
येथील नारायण मंदिर हॉलमध्ये सुरू करण्यात आलेल्या “हातमाग व यंत्रमाग” कापडाच्या भव्य प्रदर्शन व विक्रीचा शुभारंभ आज मोठ्या दिमाखात करण्यात आला. या प्रदर्शनाच्या माध्यमातून सावंतवाडीकरांसाठी खास सोलापुरी कपडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर विशेष म्हणजे या प्रदर्शनात कोणत्याही खरेदीवर तब्बल २०% पर्यंतची सूट मिळणार आहे. तरी जास्तीत-जास्त ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रदर्शनाच्या प्रमुखांकडून करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन आज धार्मिक पद्धतीने मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी
पांडुरंग पोतन, पुरुषोत्तम पोतन, लक्ष्मण उडता, दिपक गुंडु, अशोक जानकी, सुदर्शन दुस्सा आदी उपस्थित होते. या प्रदर्शना मध्ये विविध प्रकारच्या कॉटन साडी, लिनन, साडी खादी साडी, इरकल माडी, सोलापूर चादर, बेडशिट, सतरंगी, टॉवेल पंचा, खादीशर्ट कॉटन शर्ट बंडी कुर्ता लेडीज बॅग, लेगीन्स, गाऊन ऑलहॅगींग ड्रेस मटेरियल, ईश्कल ड्रेस मटेरियल असे विविध प्रकार विक्री साठी ठेवण्यात आले आहेत सली व खादी कापडाच्या विक्रीवर 20% टक्के सूट ठेवण्यात आली असून सावंतवाडी करानी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

