रायगडशासकीयसामाजिक

रायगड जिल्ह्यात ऐतिहासिक वास्तू,दुर्ग/किल्ले,स्मारके,संग्रहालये पर्यटक नागरिकांसाठी खुले..

▪️मात्र कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनासंबंधीच्या नियमांचे पालन आवश्यक; जिल्हाधिकारी निधी चौधरी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रायगड

🎴रायगड,दि.12: कोविड-19 प्रादूर्भावाच्या अनुषंगाने पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखालील ऐतिहासिक वास्तू, दुर्ग/किल्ले, स्मारके, संग्रहालये इत्यादी दि.31 मार्च 2020 पासून बंद केले होते. मात्र, आता शासनाने मिशन बिगेन अंतर्गत लॉकडाऊन शिथिल करुन, विविध बाबींना निर्बंधातून वगळले आहे. तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखालील स्मारके, संग्रहालये इ. खुले करण्यासंदर्भात दि.04 जून 2020 रोजी मानक कार्यप्रणाली लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तू, दुर्ग/किल्ले, स्मारके, संग्रालये इ. मध्ये पर्यटक नगारिक यांच्या प्रवेशास मान्यता देणे आवश्यक असल्याची खात्री झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग/किल्ले, स्मारके, संग्रहालये इ. पर्यटक/नागरिक इ. साठी कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटी व शर्तीसह खुले करण्यास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मान्यता दिली आहे.

या ठिकाणी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याद्वारे निर्गमित केलेल्या व शासन, सार्वजानिक आरोग्य विभाग तसेच पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निर्गमित केल्या जाणाऱ्या मानक कार्यप्रणाली अवलंब करणे बंधनकारक राहील. तसेच या ठिकाणी आवश्यक शारिरीक अंतर बाळगणे, मास्क घालणे व वेळोवळी करणे सर्व संबधितांवर बंधनकारक राहणार आहे.

रायगड जिल्ह्यास विविध ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तू, दुर्ग/किल्ले, स्मारके, संग्रहालये इ. ठिकाणी दरवर्षी मोठया प्रमाणात दुर्गप्रेमी, पर्यटक भेटी देत असतात. या पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत असतो. कोविड-19 विषाणूच्या प्रादूर्भावाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, दुर्ग/किल्ले, स्मारके, संग्रहालये इ. ठिकाणी नागरिकांना तसेच पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आलेला होता. जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, दुर्ग/ किल्ले, स्मारके, संग्रालये पर्यटकांसाठी/नागरिकांसाठी खुले करण्याबाबत वारंवार विविध संघटना, संस्था, दुर्गप्रेमी यांच्याकडून सातत्याने मागणी केली जात होती. ही वस्तुस्थिती विचारात घेता जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग/किल्ले, स्मारके, संग्रहालये इ. पर्यटक/नागरिक इ. साठी कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटी व शर्तीसह खुले करण्यास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मान्यता दिली आहे.

मात्र कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनासंबंधी दिलेल्या आदेशाचे व सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 269, 270, 271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतूदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!