कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 अपहरण गुन्ह्यातील मुलीचा दोन तासात शोध..

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

   _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२९:-* अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची कणकवली पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास नोंद झाली अन् त्यानंतर अवघ्या दोन तासांतच या मुलीचा कणकवली पोलिसांनी छडा लावला. पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे यांनी वेगवेगळ्या योजना माहिती घेत कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिसांची मदत घेऊन मुलीला शोधले. ही मुलगी कोल्हापूर शहरापासून काही अंतरावर आपल्या मित्राच्या घरी आढळून आली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास मुलीच्या मित्राच्या कुटुंबियांनी मुलीला कणकवलीत आणून सोडले. मुलगी सुखरुप परतली, याबाबत तिच्या कुटुंबियांनीही उपनिरीक्षक वृषाली बरगे यांचे आभार मानले.

 

घटना अशी, तालुक्यातील सतरावर्षीय युवती रविवारी सायंकाळी राहत्या घरातून बेपत्ता झाली. तिचा मोबाईलही घरीच होता. मुलीच्या कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. पण, ती कुठेच आढळून न आल्याने तिच्या कुटुंबियांनी सोमवारी दुपारी १२.३० वा. सुमारास कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपल्या मुलीचा एक मित्र कोल्हापूर येथे असून ती त्याच्यासोबतच गेली आहे, असे मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले. त्यानुसार कणकवली पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

उपनिरीक्षक बरगे यांनी मुलीच्या त्या मित्राच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचाही मोबाईल बंदच होता. एकीकडे मुलीचा मोबाईल आपल्या घरीच तर तिच्या मित्राचाही

मोबाईल बंद असल्याने मुलीला शोधायचे कुठे, असा प्रश्न पोलिसांसमोर होता. मात्र, बरगे यांनी सहकारी पोलिसांच्या साथीने वेगवेगळ्या योजना आखत माहिती घेतली. त्यात सदरची मुलगी कोल्हापूर शहरापासून काही अंतरावरील गावात असल्याचे समजल्यानंतर बरगे यांनी कोल्हापूर पोलिसांची मदत घेतली. कोल्हापूर पोलिसांनी मुलगी असलेल्या गावात जाऊन घडला प्रकार सांगितला. पोलीस ठाण्यात हजर केले.त्यानंतर मुलीच्या मित्राच्या कुटुंबियांनी स्वतःहून मुलीला सायंकाळच्या सुमारास कणकवली पोलीस ठाण्यात हजर केले.

 

आपण एका लग्नासाठी मित्रासोबत गेले होते. घरातून पाठविणार नाहीत, म्हणून कुणालाही न सांगता, मोबाईल घरी ठेवून आपण गेल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी नियमानुसार मुलीस बालकल्याण विभागाच्या ताब्यात दिले आहे.

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!