शहरातील मोती तलावात पडलेल्या अज्ञात व्यक्तीचा अखेर मृतदेह सापडला;बाबल अल्मेडा टीम ने काढले बाहेर
*🎴 सावंतवाडी,दि .२७:* शहरातील मोती तलावाच्या काठावर बसलेली अज्ञात व्यक्ती मोती तलावात पडली आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी च्या सुमारास घडली.त्यानंतर लगेचच रात्री बाबल अल्मेडा ची टीम सावंतवाडीत दाखल झाली व शोध कार्य सुरु केले आणि रात्री ११ च्या सुमारास मोती तलावात पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेहाची ओळख पटली असून ही चराठा गावठणवाडी येथील असून त्या व्यक्तीचे नाव संतोष मेस्त्री असे आहे, त्यानंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.

