कपडे विक्री करणाऱ्या बाहेरील व्यापाऱ्यांविरोधात स्थानिकांनी घेतला आक्रमक पवित्रा
सावंतवाडी शहरात येऊन कमी किमतीत कपडे विक्री करणाऱ्या कोल्हापूर येथील व्यापाऱ्याच्या विरोधात स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवत नाराजी व्यक्त केली, आठवडा बाजाराला बाहेरच्या व्यापाऱ्यांला बसण्यास परवानगी असताना इतर दिवशी बाहेरचे व्यापारी आले तर स्थानिकांनी काय करायचे असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे यानंतर पालिकेचे अधिकारी येऊन त्या व्यापाऱ्यावर दडात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले, ही घटना आज सायंकाळी घडली मात्र यात स्थानिक व्यापारी यांनी बाहेरील व्यापाऱ्यांना बसण्यास देऊ नये अशी मागणी देखील नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.