🟥 गणित चुकल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण
🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि-१८:-* तालुक्यातील एका गावातील प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या सात वर्षीय विद्यार्थ्यास गणित चुकल्याच्या कारणावरून तेथील शिक्षकाने मारहाण केली. या मारहाणीत पीडित विद्यार्थ्याच्या पाठीवर तीव्र व्रणही उठले आहेत. ही घटना बुधवारी घडली. याबाबतची तक्रार पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी गुरुवारी शिक्षण विभागाकडे केली आहे. घटनेच्या वृत्ताला शिक्षण विभागाने दुजोरा दिला असून या घटनेची चौकशीही सुरू करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार, संबंधित पीडित विद्यार्थ्याने त्याच्या प्रशालेतील शिक्षकाने गणित चुकल्याच्या कारणावरून पाठीवर मारहाण केल्याचे आपल्या पालकांना सांगितले. त्यानंतर पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी त्याची वैद्यकीय तपासणी केल्याचे समजते. गुरुवारी पीडित मुलासह त्याच्या पालकांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार पीडित मुलाच्या पालकांनी तक्रार शिक्षण विभागाकडे दिली. गणित अचूकच यायला हवे, असे गृहीत धरून एखाद्या विद्यार्थ्याला मारहाण करणे ही बाब शिक्षकी पेशाला शोभनीय नाही. त्यामुळे कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पीडित विद्यर्थ्याच्या पालकांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

