🟥 कसाल रेल्वे स्टेशन मंजूर होण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साईनाथ आंबेरकर दिले निवेदन
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१७:-* भारतातील आणि महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र सरकारने घोषित केल्यानंतर जवळपास किमान ११ वर्षे झाली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अपेक्षित असा विकास झाला नाही. याचे कारण म्हणजे केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे चुकीचे नियोजन झालं याचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आणि आताच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर लागून असलेल्या कसाल गावाला बसला आहे. स्वप्न नव्हे सत्य हे ब्रीद वाक्य घेऊन कोकण रेल्वे कोकणात आली कोकण रेल्वेची सेवा चालू होऊन २५ वर्षे पूर्ण झाली कोकण रेल्वेच्या लोहमार्गा वरून रेल्वे स्थानकांचे सर्वेक्षण करण्यात आले. नंतर सर्वेक्षण पूर्ण होऊन रेल्वे प्रशासना तर्फे नकाशा प्रसिद्ध करण्यात आला या सर्वेक्षण नकाशामध्ये कसाल येथे रेल्वे स्थानक मंजूर करण्यात आले होते. मात्र हे कसाल रेल्वे स्थानक काही शासकीय कारण दाखवून पुढे चार किलोमीटर सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे साकारण्यात आले. व कसाल वासीयांबरोबर आजूबाजूच्या २५ ते ३० गावांचा होणारा विकास केंद्र शासनाने रोखला. कसाल रेल्वे स्थानक मंजूर होण्यासाठी कसाल ग्रामस्थांनी सण १९९८ ते आतापर्यंत खूप संघर्ष केला आहे .तत्कालीन रेल्वेमंत्री मधु दंडवते ,ममता बॅनर्जी, राम नाईक, सुरेश प्रभू या रेल्वे मंत्र्यांना निवेदने देण्यात आली. रेल्वे स्थानकामधील अंतर व रेल्वे मार्गाचे दुपदरीकरणात कसाल रेल्वे स्थानक होणार असल्याचे कारण दाखवून रेल्वे प्रशासनाकडून चालठकलपणा करण्यात आला. कसाल बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ असून कसाल सिंधुदुर्गातील मध्यवर्ती ठिकाण आहे हा गाव २५ ते ३० गावांशी जोडलेला असून कसाल हे सिंधुदुर्गातील मध्यवर्ती ठिकाण आहे. कुडाळ कणकवली मालवण या तिन्ही तालुक्यांना याच गावातून वाहतूक करण्यात येते. सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली, आंगणेवाडी या पर्यटन स्थळांना कसाल गावातूनच पुढे मार्ग जातो. कसाल गावापासून सिंधुदुर्ग नगरी ओरोस रेल्वे स्थानक हे निर्जन अशा चार किलोमीटर अंतरावर आहे. या स्थानकापासून येताना करण्यासाठी काहीशी आर्थिक परिस्थिती नसल्याने त्या निर्जन भागातून पायपीट करावी लागते. ही गरज लक्षात घेता कसाल येथे रेल्वे स्थानक होण्याची गरज आहे. कसाल येथे रेल्वे स्थानक झाले तर पर्यटन हंगामी व्यवसाय व स्वयंरोजगाराला चालना मिळू शकते तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नंबर चे रेल्वे प्रवासी आणि रेल्वे प्रशासनाला आर्थिक नफा देणारे कसाल रेल्वे स्थानक ठरू शकते. तरी आपण जुन्या सर्वेक्षणानुसार रेल्वे स्थानकाच्या आरक्षित करण्यात आलेल्या जागेचा परत एकदा सर्वेक्षण करून कसाल रेल्वे स्थानक मंजूर करून कसाल दशक्रोशीतील व आजूबाजूच्या २५ ते ३० गावातील ग्रामस्थांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी सर्व समाजातील संघटना, स्थानिक मंडळे, ग्रामपंचायत यांनी मासिक सभा व ग्रामसभा ठराव कसाल , वेताळबांबार्डे, गावराई, गुरामवाडी,हेदुळ, गोळवण कुमामे, डिकवल खोटले, वांयगवडे ,मसुरे डांगमोडे, वेरळ, चाफेखोल ,माळगाव,
पोईप राठविडे,हिवाळे, ओवळिये,कुंदे पोखरण कुसबे, येथील ग्रामपंचायतचे ठराव तसेच येथील एक हजार नागरिकांची सह्याचे निवेदन कसाल येथील सामाजिक कार्यकर्ते साईनाथ प्रभाकर आंबेरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

