🟥 सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम
*🟥 गावपातळीवर बैठका व हालचालींना वेग*
*🟥 गाव पॅनल उतरणार रिंगणात ; राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१४:-* राज्यातील 7751 ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. गावपातळीवर संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी ग्रामपंचायतींवर वर्चस्व असणे हे महत्त्वाचे असते. या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधणीला लागले आहेत. मुदत संपलल्या ग्रामपंचायतींच्या म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 325 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 18 डिसेंबरला होणार आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित गावांमध्ये राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीना अनेक अधिकार दिले आहेत .विकास कामांचा निधी थेट ग्रामपंचायतीना मिळू लागला आहे. यामुळे गेल्या काही वर्षापासून ग्रामपंचायत निवडणुका सर्वच पक्षाच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केले आहेत. या निवडणुका गाव पातळीवरील विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जाणार असून सर्वच राजकीय पक्ष आता उमेदवारांची चाचणी व अन्य मोर्चे बांधणीला लागले आहेत .यातून ग्रामीण भागात पक्षाचे नेटवर्क अधिक भक्कम करणे हा या मागचा उद्देश असतो. ग्रामपंचायत निवडणुका या थेट पक्षाचे चिन्हांवर लढवल्या जात नसल्या तरी त्या त्या पक्षाचे पॅनल रिंगणात उभे केले जाते. तर गाव पॅनल निवडणुका लढवल्या जातात. या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये थेट सरपंच पदासाठी निवडणुका होणार आहेत. सरपंच पदाची निवडणूक आरक्षणाप्रमाणे होणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण असे आरक्षण असणार आहे. तर काही ठिकाणी सरपंच पद सर्वसाधारण आहे. या ठिकाणी उमेदवारांची चुरस असणार आहे. सिंधुदुर्गात कणकवली 58 मालवण 55 कुडाळ 54 सावंतवाडी 52 देवगड 38 दोडामार्ग 28 वेंगुर्ला 23 वैभववाडी 17 या तालुक्यातील 325 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी आरक्षणानुसार उमेदवारांची चाचणी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. गावागावात पक्षांतर्गत बैठकांना वेग आला आहे. 28 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून गावागावात प्रचाराचा धुराळा उडणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान 18 डिसेंबरला आणि मतमोजणी 20 डिसेंबरला होणार आहे. यामुळे सर्वच ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांमध्ये काटे की टक्कर होणार हे मात्र निश्चित. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय घडामोडींवर कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनल वाचकांना नवनवीन अपडेट देत राहणार हे मात्र निश्चित.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

