कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

ना धोका, ना प्रदुषण , शेतीचे होते संरक्षण! केर येथील शेतकऱ्याने शेतीच्या संरक्षणासाठी तयार केली बंदूक.

ना धोका, ना प्रदुषण , शेतीचे होते संरक्षण!
केर येथील शेतकऱ्याने शेतीच्या संरक्षणासाठी तयार केली बंदूक.

शेती करायची म्हटली की समोर येते वन्य प्राण्यांची दहशत एरव्ही डोंगर भागात राहणारे प्राणी आता घरापर्यंत येऊ लागले आहेत.वन्यप्राण्यापासून शेती संरक्षण करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज, फटाके लावणे असे अनेक प्रकारे शेतकरी शक्कल लढवीत असतं
अशीच एक शक्कल दोडामार्ग तालुक्यातील केर गावातील शेतकऱ्यांने लढविली आहे.प्राण्यांना कोणतीही इजा न होता स्फोट सदृश्य आवाज पाईपमधून येऊन वन्य प्राणी पळतात व शेतीचे नुकसान टळते. हे अनोखे बंदूक ‌सदृश साधन चर्चेत आले असून युट्यूबचा आधार घेत बनविले आहे.यातून सोशल साईटचा व स्मार्टफोनचा वापर ‌ चांगल्या प्रकारे करता येतो हे शेतकऱ्याने दाखवून दिले आहे या शेतकऱ्यांचे नाव आहे चंद्रकांत रामचंद्र देसाई. ही बंदूक बनवण्याचा उद्देश म्हणजे शेतीचे संरक्षण यामुळे शेतकऱ्यांना मदत होणार आहे.ही बंदूक हाताळण्यासाठी सोपी, सुरक्षित आणि कमी खर्चिक आहे. ही बंदूक पियुसी पाईपचा वापर करून केलेली आहे.पाठीमागील भागात लायटर आणि त्यावर आतील भागातून बाॅडीस्पे फवारली की समोरील पाईपचे तोंड कागदाचा बोळा घालून बंद करावे लागते.त्यानंतर लायटरचा खटका दाबल्यावर साधारण पन्नास मीटर अंतरावर हा कागद जाऊन पडतो.याचा आवाज बंदूकीच्या गोळी प्रमाणे मोठा येतो.या आवाजाने प्राणी जंगला
च्या‌ दिशेने पळतात. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही.शिवाय ही बंदूक पूर्ण सुरक्षित असून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!