तळकोकणातील दक्षिण पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या सोनुर्ली – मळगांव ता.सावंतवाडी येथील श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला भाविकांची सकाळपासूनच गर्दी
*तळकोकणातील दक्षिण पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या सोनुर्ली – मळगांव ता.सावंतवाडी येथील श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला भाविकांची सकाळपासूनच गर्दी
*जत्रोत्सवाच्या नियोजनासाठी पोलीस प्रशासन, राज्य वीज पुरवठा मंडळाचे कर्मचारी सज्ज
श्री देवी सोनूर्ली माऊली देवीच्या चरणी लीन होऊन तीच्या चरणी शतशंः क्षमायाचना करुन हा लेख श्री देवी माऊली चरणी आम्ही वहात आहोत.
श्री महीषासुरमर्दीनीच्या रुपात वसलेली श्री देवी सोनूर्ली माऊलीदेवीचा महा जत्रोत्सव आज रोजी होत आहे.सावंतवाडी तालूक्यातील जागृत देवस्थानामधील प्रमुख दैवी प्रचीती आलेले देवस्थान म्हणजे सोनूर्ली मधील श्री देवी माऊली मंदीर.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखौ भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी माऊली आईच्या दर्शनासाठी आजपासूनच सुरुवात होत आहे.
लोटांगणाची जत्रा म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा कर्नाटक आदी विविध राज्यांमध्ये मोठ्या संख्येने भाविकांची आज दर्शनासाठी रिघ लागणार आहे.माहेरवाशीण सुहासिनीना ओटी भरण्याचा मान असलेल्या श्री देव सोनूर्ली माऊली देवीच्या पदस्पर्शाने पूनीत झालेल्या दक्षिण कोकणातील या जत्रोत्सवाला होणारी गर्दीच देवी महात्म्याचा अनुभव व प्रचीती भाविकांना देत आह.

