हिंदूंच्या तीव्र विरोधामुळे मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ रहित !
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई, दि-०८:-* समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे ‘हलाल प्रमाणित’ वस्तूंचे ‘प्रमोशन’ करण्यासाठी मुंबईत आयोजित केलेला ‘हलाल शो इंडिया’ आयोजकांनी रहित केल्याचे जाहीर केले. हा संघटित हिंदूंच्या सनदशीर मार्गाने केलेल्या प्रतिकाराचा विजय आहे. हा केवळ आरंभ आहे, देशातील ‘हलाल प्रमाणिकरण’ पद्धत बंद होईपर्यंत आमचा लढा चालूच राहिल, अशी प्रतिक्रिया ‘हलाल सक्ती विरोधी कृती समिती’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केली. समितीच्या या यशाबद्दल श्री. घनवट यांनी सहभागी सर्व संघटना आणि कार्यकर्ते यांचे आभार मानले, तसेच ईश्वरचरणी कृतज्ञताही व्यक्त केली.
मरीन ड्राईव्ह येथील ‘इस्लामिक जिमखाना’ येथे १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी ‘ब्लॉसम मिडिया’ने हा कार्यक्रम आयोजित केला होता. हलाल प्रमाणपत्राद्वारे मिळणारा पैसा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचे लक्षात आल्यावर ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ने या कार्यक्रमाला तीव्र विरोध केला.
‘हलाल शो इंडिया’ हा कार्यक्रम रहित व्हावा, यासाठी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या वतीने मुंबई, ठाणे आणि रायगड येथे ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली, तसेच बैठका घेण्यात आल्या. हा कार्यक्रम झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करण्याची चेतावणी समस्त हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी दिली होती. ‘हलाल शो इंडिया’ रहित व्हावा, यासाठी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या शिष्टमंडळाने मुंबईचे पोलीस सहआयुक्त श्री. विश्वास नांगरे-पाटील आणि विशेष पोलीस शाखेचे उपायुक्त डॉ. शिवाजी पाटील यांची भेट घेतली. यावेळी मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन हलाल प्रमाणपत्रातून मिळणारा पैशाचा वापर कुठे केला जातो, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही समितीने केली आहे.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आदी देशांत हलाल प्रमाणपत्र आणि हलाल वस्तू यांच्या विक्रीतून मिळणारा पैसा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचे उघड झाले आहे. त्याप्रमाणे भारतातही हलाल प्रमाणपत्र देणार्या ‘जमियत उलेमा-ए-हिन्द हलाल ट्रस्ट’ ने मुंबईतील ‘२६/११’चा बाँबस्फोट, झवेरी बाजारातील साखळी बाँबस्फोट, देहलीतील जामा मशीदीमधील बाँबस्फोट, पुणे येथील जर्मन बेकरी बाँबस्फोट, वर्ष २००६ चा मालेगाव बाँबस्फोट, अहमदाबाद बाँबस्फोट आदी अनेक आतंकवादी कारवायांतील आरोपींना कायदेविषयक साहाय्य करत असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘इंडियन मुजाहिदीन’, ‘इस्लामिक स्टेट’ अशा विविध आतंकवादी संघटनांशी संबंधित सुमारे ७०० संशयित आरोपींच्या खटल्यांना आर्थिक साहाय्य केले जात आहे. भारतात खाद्यपदार्थांना प्रमाणपत्र देण्यासाठी केंद्रीय संस्था ‘FSSAI’ आणि ‘FDA’ अर्थात राज्याचे ‘अन्न आणि औषध प्रशासन’ हे विभाग असतांना हिंदुबहुल भारतात वेगळ्या ‘हलाल प्रमाणपत्रा’ची सक्ती कशासाठी ? त्यामुळे ‘हलाल उत्पादनां’चे उदात्तीकरण करणार्या कार्यक्रमांना पोलीस-प्रशासनाने अनुमतीच देऊ नये, अशी मागणी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या वतीने श्री. सुनील घनवट यांनी केली.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🥳🎊जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींगचा सुपर धमाका ऑफर🥳🎊*
_सावंतवाडीत एलइडी टिव्ही, वॉटर प्युरिफायर,वॉशिंग मशीन किंवा फ्रिज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी सुप्रसिद्ध असं जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींग घेऊन आले आहेत *सुपर धमाका ऑफर* ज्यामध्ये तब्बल 50 टक्के सूट मिळणार आहे._
_एवढंच नव्हे, तर *फक्त 101 रू* भरून LED TV अधिक फ्रीज खरेदी करायची *सुवर्णसंधी*_
*ब्रॅण्डेड स्मार्ट टिव्हीत 48 हजारचा 32″ SMART TV + REFRIGERATOR फक्त 23,990*
*60 हजारचा 43″ SMART TV + REFRIGERATOR 29,990*
*96 हजारचा 50″ SMART TV+ REFRIGERATOR फक्त 47,990*
*🥳तब्बल 1 लाख 10 हजारचा 55″ SMART TV + REFRIGERATOR देखील फक्त 54,990*
*📺टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदी करण्याच तुमचं स्वप्न अगदी खिशाला परवडेल अशा किंमतीत J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING साकार करणार*
_💸बजाज फायनान्सची सुविधा सुद्दा उपलब्ध असून ऑफर आमची, निवड तुमची या विशेष स्कीम मध्ये_
*🟧52,500 रू. चा DOUBLE DOOR CONVERTIBLE REFRIGERATOR (278 Ltr) फक्त 40 हजारांत अधिक 25 हजारांचा HAIER LED TV अगदी FREE*
*🗯️एवढंच नव्हे तर, वॉटर प्युरिफायर, वॉशिंग मशीन किंवा फ्रिज ग्राहकांच्या निवडीनुसार वरील ऑफरमध्ये दिले जाणार आहेत.*
_🚶♂️मग, वाट कसली बघताय,आजच भेट द्या… अन् खरेदी करा, तुमच्या स्वप्नातील वस्तू_
*🏪आमचा पत्ता :-*
J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING
बापुसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, शॉप नं. ६. मेन रोड,सावंतवाडी
*अधिक माहितीसाठी* 9822123102 sonubaig@ymail.com
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

