कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

त्रिपुरारी पौर्णिमा शहरातील रहिवाशांनी देवळात पणत्या लावून साजरी करावी -माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर.

त्रिपुरारी पौर्णिमा शहरातील रहिवाशांनी देवळात पणत्या लावून साजरी करावी -माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर.

प्रत्येक महिला भगिनीने आपल्या घरातून पाच तरी पणत्या देवळात लावाव्यात

सावंतवाडी शहरातील विठ्ठल मंदिर, आत्मेश्वर मंदिर, दत्त मंदिर, भटवाडीतील विठ्ठल मंदिर आणि शहरातील अनेक मारुती मंदिर आहे या मंदिरातील प्रत्येक मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा निमीत्त दीपोत्सव साजरा करावा असे आवहन माजी नगराध्यक्ष बबन. साळगावकर यांनी केली आहे.
काही मंदिरामध्ये पूर्वीपासून त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दीपोत्सव होत आहे, शहराची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने एक प्रयत्न म्हणून यावर्षीपासून प्रत्येक मंदिरामध्ये त्या त्या भागातील व्यवस्थापनाने दीपोत्सवामध्ये सहभागी व्हावे यासाठी सर्व मंदिर व्यवस्थापनाला भेटून विनंती करण्यात येणार आहे असे साळगावकर यांनी म्हटले आहे.
दीपोत्सवामध्ये पारंपारिक पणत्या लावून दीपोत्सव करावा अशीही सूचना बबन साळगावकर यांनी केली आहे कुठेही मंदिरामध्ये मेणबत्तीचा वापर करण्यात येऊ नये उत्सव सर्व मंदिरामध्ये साजरा करून मंदिर प्रशासनाने सावंतवाडी शहराची वेगळी ओळख निर्माण करावी तसेच उत्सवामध्ये महिलांनी मोठा सहभाग दर्शवावा व सावंतवाडी शहरातील या दुप्पोत्सवासाठी सर्वांनी प्रयत्न करावे,व प्रत्येक महीलांनी घरातून पाच पणत्या आणून आपल्या नजीकच्या देवळात लावाव्यात असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!