..तर जनता सुखावली असती : डी.के.सावंत
*🟥…तर जनता सुखावली असती : डी.के.सावंत*
🟥 *अधिकाऱ्यांच्या ‘त्या’ शपथीवर टीका*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :ब्युरो न्यूज*
*🎴 सावंतवाडी , दि.3 नोव्हेंबर*
जिल्हाधिकाऱ्यांनी ‘लाच घेणार नाही, देणार नाही’, अशी व शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यापेक्षा दप्तर दिरंगाई खपवून घेणार नाही, असे म्हटले असते तर जनता सुखावली असती, असे सामाजिक कार्यकर्ते डी. के. सावंत यांनी सांगितले.सावंत यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार न करण्यासाठी शपथ देतानाचा जिल्हाधिकाऱ्यांचा फोटो वर्तमानपत्रात पाहिला. वास्तविक त्या शपथेला काहीच अर्थ नाही. ती शपथ कर्मचाऱ्यांकडून घेताना त्यांना स्वतःच्या मुलांच्या किंवा आईच्या डोक्यावर हात ठेवून घ्यायला भाग
पाडायला हवे होते. ही त्यांनी घेतलेली शपथ पाहिल्यानंतर बालवाडीतील मुलांची आठवण आली. कारण शपथेनंतरही त्यांच्या कार्यपद्धतीवर व लाच घेण्यावर काही फरक पडेल, यावर लहान मुलही विश्वास ठेवणार नाहीत. काहीही कारण नसताना महिनोंमहिने प्रकरणे टेबलावर दाबून ठेवून तडजोड करून निर्णय घेणे हे नेहमीचेच. या सगळ्याला अपवाद असलेले काही इमानदार कर्मचारी आहेत; पण त्यांचे प्रमाण कमीच. याची पुराव्यासह उदाहरणे देऊ शकतो. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना शपथेपेक्षा टेबलावरील प्रकरणे मुदतीत हलविण्याचे आदेश देणे गरजेचे होते. त्याचीच खरी गरज होती. दप्तर दिरंगाई हा सर्वात मोठा शाप येथील जनता भोगत आहे. त्यामुळे जनतेचा पैसा व वेळेचा अपव्यय होऊन सर्वसामान्य जनतेचे नुकसान होत आहे. महागाई वाढण्याचे हेही एक कारण आहे, असे सावंत यांनी म्हटले आहे.
*………….._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

