कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

रसिकांचे प्रेम आणि कलाकारांची साथ दशावतार क्षेत्रातज शत्रू गवस यांची झेप

रसिकांचे प्रेम आणि कलाकारांची साथ दशावतार क्षेत्रातज शत्रू गवस यांची झेप

दोडामार्ग

कोकणला कला क्षेत्रात सुवर्णयुग सर्वच दशावतार कलाकार आणत आहे त्या कलाकारांची किमया महान आहे. पिकुळे येथील एका ग्रामीण भागातील कलाकार शत्रू गवस यांनी दशावतार क्षेत्रात योगदान दिले आहे.गवस हे गेली अनेक वर्षे दशावतार रंगभूमीवर नारदाची भूमिका साकारतात अतिशय कष्टमय प्रवास करत त्यांनी कोकणच्या कलेला योगदान देणे सुरू ठेवले आहे.त्यांनी सिद्धिविनायक दशावतार कंपनी स्थापन केली असून त्यांचा हा प्रवास कौतुकास्पद आहे त्यांचे कोकणच्या केलेतील योगदान लक्षात घेऊन आदर्श गाव केर येथे त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.फ.रा.प्रतिष्टानचे अध्यक्ष यांच्याकडून पुरस्कृत शाल, श्री फळ, सन्मानचिन्ह,भगवतगीता ग्रंथ जेष्ठ दशावतार कलाकार विष्णू देसाई यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.आपण स्वतः ची नाट्य कंपनी सुरू करण्याचा विचार सुरू केला मात्र कोणतीही जमापुंजी नव्हती केवळ रसिकांचे प्रेम आणि कलाकारांची साथ होती. त्यामुळे हे धाडस करू शकलो.आदर्श गावाने आपला केलेला सन्मान आम्हाला प्रेरणा देणारा ठरेल असे श्री. गवस म्हणाले.आपल्या या प्रवासात रसिक मायबाप यांची साथ नक्कीच लाभेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!