सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी बांधकाम अधिकारी हटाव व रस्ते बचाव -संजय लाड
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी बांधकाम अधिकारी हटाव व रस्ते बचाव -संजय लाड
२८नोव्हेंबर रोजी प्रशासनास जाग आणण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालया समोर उपोषण
रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण करून ठेवणाऱ्या सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता हटाव आणि रस्ते सुरक्षित बचाव मोहिमेसाठी उपविभागीय अधिकारी महसूल सावंतवाडी तथा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर दिनांक 28/10 /2022 होणाऱ्या उपोषणास बहुसंख्येने उपस्थित राहून हक्क अबाधित ठेवण्यासाठी नोकरशहांना त्यांच्या कर्तव्याची जाग आणण्यासाठी बहुसंख्येने
उपस्थित राहवे असे आवाहन माडखोल गावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते संजय लाड यांनी केले आहे.
. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यातील तमाम नागरिकांना, टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर वाहनधारक, चालक व मालकांना विनम्र आवाहन करण्यात येते की सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यातील रस्ते वाहतुकीस अयोग्य आहेत यामुळे अपघात होऊन काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंता आहेत म्हणून त्यांच्या विरुद्ध हटाव मोहीम राबविण्यात येत आहे यात आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे असे संजय लाड यांनी म्हटले आहे.

