कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

कोलगाव जि प मध्ये भाजपचे कमळ फुलवून पुढच्या वाढदिनी मला भेट द्या- महेश सारंग

कोलगाव जि प मध्ये भाजपचे कमळ फुलवून पुढच्या वाढदिनी मला भेट द्या- महेश सारंग

राजकारणात कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघात थोडक्या मतांनी झालेला माझा पराभव माझ्या जिव्हारी-

माझ्या कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातील माझा झालेला निसटता पराभव हा माझ्या जीवाला लागला आहे, या मतदारसंघात कोणीही उमेदवार असला तरी भाजपचे कमळ फुलले पाहिजे त्या दृष्टीने माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे व माझ्या पुढच्या वाढदिवसाला हा मतदारसंघ भाजपचे कमळ फुलून भेट द्यावी असे आवाहन भाजपचे जिल्हा चिटणीस व जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांनी आपल्या वाढदिवसाच्या प्रसंगी अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
महेश सारंग यांचा वाढदिवस आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला ,यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महेश सारंग यांच्या भावी वाटचालीस देताना सारंग यांची राजकीय कारकीर्द उत्तरोत्तर भरत जावो अशा सदीच्छा व्यक्त केल्या तर महेश सारंग यांनी कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे आपण आज तगायत राजकारणात टिकून आहे, असेच प्रेम आपण कायम ठेवावे, मात्र मी ज्या मतदार संघाचे नेतृत्व करतो त्या मतदारसंघात यश खचून आणतो असे असताना माझ्याच मतदारसंघात माझाच अगदी थोडक्या मतांनी झालेला पराभव हा माझ्या जिव्हारी लागला आहे.
आता काही महिन्यातच जिल्हा परिषदेचे निवडणूक होऊ घातली आहे, या ठिकाणी आरक्षण काही पडो मात्र भाजपचेच कमळ या मतदारसंघात फुले पाहिजे त्या दृष्टीने आतापासूनच कामाला लागा व या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आणून मला वाढदिवसाची भेट द्या असे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना सारंग यांनी केले.
यावेळी कोलगाव चे सरपंच संतोष राऊळ,यांनी महेश सारंग यांचे मार्गदर्शन हे आमच्यासाठी लाखमोलाचे आहे,कार्यकर्त्यांसाठी अहोरात्र झटणारा व मेहनत करणारा सच्चा कार्यकर्ता महेश सारंग आहे, म्हणूनच त्यांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे,कोलगाव ग्रामस्थांच्या वतीने आपण त्यांना दीर्घायुष्य चिंतून पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक ॲड परिमल नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले,याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!