कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

विलवडे माऊली मंदिरात उद्या हरिनाम सप्ताह

विलवडे माऊली मंदिरात उद्या हरिनाम सप्ताह

प्रतिनिधी ओटवणे -:
विलवडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सालाबादप्रमाणे २१ ऑक्टोबर रोजी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सात प्रहाराच्या या हरिनाम सप्ताहाची सांगता दुसऱ्या दिवशी शनिवारी होणार आहे. यानिमित्त सकाळी मंदिरात पालखीचे आगमन होणार आहे. त्यानंतर देवीची पूजाआटोपल्यानंतर हरिनाम सप्ताहाला विधिवत प्रारंभ होणार आहे. सायंकाळी गावातील महिलांच्या दिंडी कार्यक्रम होणार आहे. रात्री ११ वाजता जागर कार्यक्रम होणार आहे. शनिवारी पहाटे काकड आरती होणार असून सकाळी नामवंत बुवाची भजने आटोपल्यानंतर सकाळी ११ नंतर सप्ताहाची सांगता होणार आहे. तसेच दुपारी महाप्रसादानंतर देवीचा कौलप्रसाद होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोपाळ दळवी (कुळकर), महादेव दळवी (स्थळकर) देवस्थान मानकरी तसेच श्री देवी माऊली देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाळकृष्ण दळवी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!