भाजपची अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार
भाजपची अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
मुंबई, दि.१७:-अंधेरी पोटनिवडणूक चे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस आधी राज ठाकरेंनी केलेल्या विनंतीनंतर भाजप अंधेरी निवडणुकीत माघार घेण्याची चर्चा सुरू झाले होते. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झालंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची घोषणा केलीये. मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेत आहोत. तसेच मुरजी पटेल अपक्षही लढणार नाहीत, असंही बावनकुळेंनी सांगितलं.

