नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची ‘दिवाळी’ ‘गोड’ होणार
*🟥नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची ‘दिवाळी’ ‘गोड’ होणार*
*🟥२० हजार ३३२ पात्र खातेदारांच्या खाती अनुदान जमा करणार:अतुल काळसेकर*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.:१४ऑक्टोंबर*
-गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची ‘दिवाळी’ ‘गोड’ होणार आहे. या शेतकऱ्यांना देय असलेले प्रोत्साहन अनुदान त्यांच्या खाती जमा करण्याची कार्यवाही होणार होणार असून त्यासाठी आधार प्रमाणीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्हा बँकेकडे असे सुमारे २० हजार ३३२ पात्र खातेदार असून दिवाळीपूर्वी हे अनुदान शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी सांगितले.
सत्तेत येतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे मंत्रिमंडळ बैठकीत निश्चित करत त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू केली याबद्दल आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो असेही श्री. काळसेकर म्हणाले.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शिंदे फडणवीस सरकारने प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला व त्याची अंमलबजावणी सुरू झाली. कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाची रक्कम अथवा ५० हजार यापैकी जी रक्कम कमी असेल एवढी रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून मिळणार आहे. यासाठी सन २०१७-१८, २०१८-१९ सन २०१९-२० हा कालावधी विचारात घेतला गेला आहे.
जिल्हा बँकेकडील पात्र कर्जदारांची संख्या 20 हजार 232 एकूण ३५ कोटी रुपयांचे होणार वितरण होणार आहे. यापैकी अपलोड केलेली कर्ज खाती 20 हजार 75 असून 157 कर्ज खाती अद्याप अपलोड करावयाचे आहेत. तर आधार प्रमानीकरण्यासाठी सुमारे १३ हजार कर्ज खाती पाठविण्यात आलेली आहेत.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान थेट खाती जमा करण्यात येणार आहे. याशिवाय राष्ट्रीयकृत बँकांकडून या कालावधीत कर्ज घेतलेल्या व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सुमारे ४ हजारच्या जवळपास आहे.
प्रोत्साहन अनुदानाचा निर्णय 2019 मध्ये जाहीर झाला पण सन २०१९ मध्ये जाहीर त्याची अंमलबजावणी झालीच नाही. या कर्जमाफी योजनेत सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांचे सुमारे ६६ कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले. मात्र, आपल्या जिल्ह्यात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. या शेतकऱ्यांना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर केले. पण, त्याची कोणतीही अंमलबजावणी शासनाने केली नव्हती. परिणामी, नियमित कर्जफेड करणारे हे शेतकरी गेल्या तीन वर्षापासून प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहिले. याला महाविकास आघाडी शासनाचा कारभार जबाबदार होता. त्यानंतर नवीन सरकार स्थापन होताच त्यांनी या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याच्या निर्णयाची तातडीने कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही कार्यवाही होत आहे. सद्यस्थितीत ज्या पात्र शेतकऱ्यांकडून केवायसी घेण्यात आलेले आहे त्यांच्याकडून सोसायट्या अथवा बँकेच्या शाखेत आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून त्यातून सेवा सोसायट्यांनाही फायदा होणार आहे
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

