कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

कुळ म्हणून नाव लावण्याकरिता मागितली ५ हजार रुपयांची लाच*

*कुळ म्हणून नाव लावण्याकरिता* *मागितली ५ हजार रुपयांची लाच*

*दाभोळे तलाठी कार्यालयात कारवाई*

*तीन हजार लाच घेताना कारवाई*

*प्रतिनिधी सुनील आचरेकर*

*सिंधुदुर्ग*

सात बारा वरील तक्रारदाराच्या शेत जमिनीवर कुळ म्हणून नाव नोंद करण्याबाबतच्या तहसीलदार देवगड यांच्या आदेशा नुसार नोंद करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितली त्यातील3हजार स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग कडून सापळा रचून दाभोळे येथील तलाठी उत्तम गंगाराम कदम वय 45, तलाठी सजा दाभोळे याला 3 हजाराची लाज घेताना रंगेहात पकडण्यात आले. तलाठी उत्तम कदम याने सात बारावर कुळ म्हणून नाव नोंद करण्याकरिता 5 हजार रुपयांची लाच मागणी होती. मात्र तडजोडीत ही रक्कम 3 हजार ठरली होती. याप्रकरणी संबंधित तक्रारदाराकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर त्यानुसार सापळा रचून तलाठी उत्तम कदम यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.अपर पोलिस आयुक्त, ठाणे तथा पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे चे पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक एसीबी ठाणे परिक्षेत्र अनिल घेरडीकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.अधीक्षक दिपक कांबळे,पो. नि.शिवाजी पाटील,पो.हवा.जनार्दन रेवणकर,पो.ना.रवी पालकर,पो. शि.प्रथमेश पोतनीस यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!