🟥 सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम ई पेमेंट उपक्रम एफसीबीए २०२२ पुरस्कार जाहीर
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*सिंधुदुर्गनगरी, दि-१०:-* देशातील सहकारी बँकिंग संस्थांचे आर्थिक मूल्यमापन करून त्यांच्या वार्षिक कामगिरीच्या आधारे गुणवत्ता मानांकन ठरवणारी संस्था नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव बँक आणि बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य इंग्रजी मासिक Banking Frontiers यांच्यामार्फत बँकिंग क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या सहकारी बँकांचा गौरव करण्यात येतो यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सर्वोत्तम ई पेमेंट उपक्रम (Best ePayment Initiative) विभागा साठी एफसीबीए २०२२ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.सदर पुरस्कार मध्यप्रदेश इंदोर येथे रविवार दि.१६ ऑक्टोंबर २०२२ रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
बँकांच्या कामकाजाचा लेखाजोखा घेऊन बँकिंग क्षेत्रामध्ये बँकांनी केलेल्या प्रगतीच्या आधारे तसेच ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली अत्याधुनिक सेवा इत्यादी बाबी विचारात घेऊन विविध कॅटेगिरी मधील पुरस्कारां साठी संबंधित बँकांची निवड करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने कोअर बँकिंग सुविधा व स्वतःचे डाटा सेंटर उभारून ग्राहकांना, व्यापारी बँकांच्या बरोबरीने जिल्ह्यात बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बँकेच्या दुर्गम भागातही असलेल्या शाखा सीबीएस संगणकिकृत केल्या आहेत त्याचबरोबर जिल्ह्यातील ९८ शाखांबरोबरच ३८ एटीम मशीन्स,मोबाईल अँपद्वारे एन इएफटी/आय एम पीएस सेवा, पॉस मशिन, युपीआय, शाखा स्तरावर बीबीपीएस, इत्यादी आधुनिक डिलिव्हरी चॅनेल्स ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहेत अन्य जिल्हा बँकेच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मोबाईल ॲप ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. यू पीआय वापरणा-या ग्राहकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.या सर्वांचे मूल्यमापन एफसीबीए २०२२च्या निवड समितीमध्ये होऊन बँकेला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे अशाप्रकारे राष्ट्रीय स्तरावरील संस्था तसेच बँकिंग फ्रंटायर्स यासारख्या इंग्रजी मासिकाने बँकेच्या कामकाजाची दखल घेतली आहे बँकेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर व बँकेचे संचालक मंडळ यांनी समाधान व्यक्त केले आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

