🟥 राजकीय नेते मंडळींनी जसा मटका,जुगार या विरुद्ध आवाज उठवला तसा आवाज गांजा,चरस, विषारी दारु या विरोधात का उठवला नाही..
🟥 सोन्याची अंडे देणारी कोंबडी मारण्याचे धाडस कोणीच का करीत नाहीत..
🟥 प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांचा हेतू तपासणे हीच खरी काळाची गरज..
🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ संपादकीय : सीताराम गावडे
🎴सावंतवाडी, दि-०३:- तीन वर्ष आम्ही कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलच्या माध्यमातून गोवा राज्यातून जी चोरट्या मार्गाने विशारी दारु येते व ती दारू पिल्याने अनेकांचे बळी गेले आहेत. याविरुद्ध व कॉलेजची युवा पिढी गांजा ,चरस, या अमली पदार्थांच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होऊन आपले आयुष्य उध्वस्त करत असल्याबाबत वेळोवेळी आवाज उठवला, मात्र कोणत्याही राजकीय पक्षांनी अथवा त्यांच्या पदाधिकारी याबाबत आपली कोणतीही भूमिका जाहीर केली नाही. माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार शिवराम दळवी, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,माजी उपनगराध्यक्ष सौ,अन्नपूर्णा कोळगावकर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले ही नेते मंडळी वगळली तर कोणीही याबाबत ब्र सुद्धा काढला नाही.मात्र जुगार व मटका या अवैध धंद्या विरुद्ध राजकीय मंडळींनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन ते तातडीने बंद करावे अशी मागणी केली. या मागणीचे आम्ही निश्चितच स्वागत करतो मात्र नागरिकांच्या मुळाशी उठलेल्या व जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या धंद्यांबाबत या मंडळींनी असा उठाव का केला नाही असा प्रश्न या निमित्ताने आम्हाला विचारावासा वाटत आहे. कारण जुगार, मटका यामुळे मनुष्याचे जीवन उद्ध्वस्त होत नाही.
मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी याबाबत आपली भूमिका वेळोवेळी मांडली,या भूमिकेचे आम्ही स्वागतही केले मात्र या गांजा,चरस, गोव्यातील विषारी दारु या विरोधात सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेते मंडळींनी कधीही चकार शब्द पण काढला नाही.आम्ही उघडलेल्या मोहिमेमुळे मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करून आरोपींना गजा आड केले गेले. तीन वर्षात सुमारे आठ कोटीची दारू जप्त केली गेली, अनेकांना पुन्हा पुन्हा त्याच गुन्ह्यात आरोपी केल्यामुळे तडीपारच्या कारवाईला सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र त्यांची तडीपारचे प्रस्ताव कोणी रोखले,कोणी मांडवली केली त्यांना कोणाचा वरदहस्त आहे हा संशोधनाचा विषय आहे.
सिंधुदुर्गात महत्त्वाच्या ठिकाणी तपासणी नाकी असताना त्या तपासणी नाक्यावरून गोवा राज्यातून विषारी दारू वाहतूक केली जाते व वाहतूक करणाऱ्यांना पुण्या ,मुंबईत ,नाशिक, कोल्हापूर मध्ये अटक केली जाते यावरून सिंधुदुर्गातले पोलीस किती तत्पर व कार्यक्षम आहे हे दिसून येते. राज्य उत्पादन शुल्क विभाग तर डोळ्यावर गांधारीची पट्टी लावून जिल्ह्यात कार्यरत आहे.त्यांच्याकडून अशा कारवाईची अपेक्षा करणे ही चुकीचे आहे.
ज्या पोट तीडकीने राजकीय मंडळींनी जिल्ह्यातील जुगार,मटका बंद करण्यासाठी पुढाकार घेतला तीच पोटतिडक गांजा,चरस, विषारी दारु बाबत दाखविली तीच तत्परता अमली पदार्थ व दारू बाबत दाखविली असती तर आम्ही त्यांचे निश्चितच कौतुक केले असते.मात्र काही गोष्टींना अभय देऊन काही गोष्टींना विरोध करणे या मागचे गोड बंगाल काय आहे याचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
महाविद्यालयीन युवा पिढी या अवैध धंद्यांकडे वळून आपल्या आयुष्य उध्वस्त करत आहेत. आई-वडिलांचा हृदय हेलावून टाकणारा आक्रोश पाहून मन हेलावून जाते,हाता -तोंडाशी आलेली मुले व्यसनाधीन होऊन आपली आयुष्य उध्वस्त करून घेतात, चरस -गांजा याच्या आहारी गेलेली मुले आपल्या घरात गळफास लावून आयुष्य संपवलेले आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले आहे, व त्यांच्या आई-वडिलांचा आक्रोश हा मन हेलावून टाकणारा होता.त्यामुळे साहजिकच याचा विरुद्ध उठाव करणे हे काळाची गरज होती म्हणून या विरुद्ध आम्ही लिहायला सुरुवात केली.
चोहो बाजूने घेरण्याचा आम्हाला प्रयत्न झाला,आमच्या भोवती चक्र व्यूह तयार करण्यात आला, मात्र कुलदेवतेच्या कृपेने असे कित्येक चक्रव्यूह भेदून आम्ही बाहेर पडलो,काहींनी तर सिताराम गावडे आपल्या लिखाणातून जातीय तेढ निर्माण करतो अशा प्रकारच्या तक्रारी केल्या. मात्र त्या तक्रारींना केराची टोपली दाखवली गेली,कारण आमची बाजू सत्याची होती, सत्य परेशान हो सकता है पराजित नही…
आम्ही आमचा लढा कधीच थांबवला नाही ,मग तो अब्जाधी झालेला शफिक शेमन असेल किंवा मिसरुड न फुटलेली व अवैध व्यवसायात अफाट पैसा मिळवलेले गब्बर असतो, कोणाच्याही धमकीला दहशतीला, दादागिरीला,बळी न पडता आम्ही आमचे लिखाण सुरूच ठेवले व ते ठेवणार,ज्या ज्या वेळी कोणीही कितीही मोठ्या पदावर असो तो काही चुकीचे करत असेल तर त्या ठिकाणी त्याला रोखण्याचे काम आम्ही करणारच, ज्या पद्धतीने आज अकरावी बारावीतील ही मुले नशेच्या आहारी गेली आहेत,कॉलेज युवक युवतींच्या दप्तरांमध्ये गांजाच्या पुड्या मिळत आहेत यावरून समाज कोणत्या दिशेने चालला आहे हे दिसून येत आहे, ही विनाशाकरची वाटचाल थांबवायची असेल तर या विरुद्ध कठोर पावले उचलणे काळाची गरज आहे.
राजकारण गेले चुलीत असे म्हणून सर्व पक्षांनी एकत्र येऊन अमली पदार्थ, विषारी दारू याविरुद्ध लढा देणे ही खरी काळाची गरज आहे तरच भावी पिढी सुजलाम सुफलाम होईल असे आम्हाला वाटते.तुर्तास एवढेच.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*ऑफर- ऑफर -ऑफर -ऑफर*
*🔹सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी🔹*
🏹🏹💻 *लॅपटॉप* 💻🪔🪔
🎊🇫 🇪 🇸 🇹 🇮 🇻 🇦 🇱
🇴 🇫 🇫 🇪 🇷 🇸 🪔🪔🪔
*गेली 20 वर्ष कॉम्प्युटर क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ सेवा देणारे सिंधुदुर्गातील एकमेव आणि अग्रगण्य मल्टिब्रँड लॅपटॉप विक्रेते 🔺आस्था कॉम्पुटर शॉपि*🔺 सावंतवाडी यांच्या कडून सादर आहे
*🔹HP 🔸LENOVO🔹 ASUS🔸 DELL🔹* या सर्व ब्रँडच्या लॅपटॉप वर *0% व्याज दरात BAJAJ फायनान्स*
तसेच
🏹👺🏹 *दसरा ते दिवाळी*🪔🪔 *दरम्यान केलेल्या*
🎁 *लॅपटॉप खरेदी वर 15 ते 20 हजार च्या Festival ऑफर्स*🎁 कालावधी 1 ते 31 ऑक्टोबर 2022
➖➖➖➖➖➖➖➖➖
💵💶 *मागील 2 वर्ष्यापासून अफाट वाढलेल्या लॅपटॉप किंमतींवर 3 ते 10 हजार 😱ची सूट* 🤩🥳🤑
⌚ *5999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🎧 *2000/- ते 3200/- चे 🎧 Artis ब्लूटूथ नेकबँड हेडसेट किंवा 🎷🔊 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🖱️⌨️ *2000/- चे RGB GAMING किंवा wireless ब्रँडेड कीबोर्ड + माऊस*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 1 व 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *650/- किं. चा वायरलेस mouse*
🎒 *1500 ते 2500 किमतीची लॅपटॉप bag*
👉 _(वरील काही वस्तू मोफत आहेत तर काही वस्तूंसाठी छोटीशी processing ऑफर फी भरणे आवश्यक…)_
🖨️🖨️🟣🟡🔵🟢⚫🖨️🖨️
*या शिवाय लॅपटॉप सोबत कलर ऑल इन वन प्रिंटर खरेदी केल्यास प्रिंटर च्या Market किंमती वर 3000/- ते 4000/- ची भरघोस सूट*
उदा. 👉🏼 HP INK Tank Printer
Market Price ~14,190/-~ चा प्रिंटर फक्त 10,???/-
💵💶💵💶💵💶💵💶💵
*आधार /पॅन / बँक पासबुक वर फक्त 15 मिनिटात BAJAJ फायनान्स उपलब्ध / सुलभ 6 ते 10 हफ्ते / 33% डाउन पेमेंट आवश्यक / फायनान्स घेणाऱ्या व्यक्तीचं 24 वर्ष वय पूर्ण असावे*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*🏡आमचा पत्ता: आस्था काॅम्प्युटर शॉपी, पहिला मजला अजिंक्य लॉज खाली*
*एसटी स्टँड जवळ आणि Axis बँक च्या मागे – सावंतवाडी*
☎️संपर्क:- लॅपटॉप Price लिस्ट साठी कॉल किंवा Whatsapp मॅसेज करावा
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 8830256755*
🖥️🖥️🖥️🪔🪔🪔🪔🪔
*🏪आमचा पत्ता :-*
J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING
बापुसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, शॉप नं. ६. मेन रोड,सावंतवाडी
*अधिक माहितीसाठी* 9822123102 sonubaig@ymail.com
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

