पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजीत सेवा पंधरवडा वस्ती संपर्क अभियानावेळी सावंतवाडी तालुक्यातील कास या गावातील व समता नगर मधील भयावह विकास उघड…* *_🟥संपर्क अभियान प्रमुख व गाववासीय यांच्या मार्फत जिल्हाधिकारी तसेच शासन व न्याय दरबारी दाद मागण्याचा इशारा व दोषींवर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी*
🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ*
*🎴 सावंतवाडी , दि१ऑक्टोबर.*
“कुंपणानेच जर शेत खाल्ले तर कोणाला विचारावे ?” या प्रश्नासहीत ,” मेलेल्याच्याही तर सोडाच परंतू जीवंत माणसाच्या टाळू वरचे तेलही कोणी खाल्ले तर कोणाकडे,कशी दाद मागावी ? ” , हपापाचा माल गपापाने गिळंकृत केला तर काय करावे ?” , ” कास वासीयांनी मागितले समाज मंदिर मात्र ग्रामपंचायत सरपंच यांनी दिला भूतबंगला”, “समता नगर वासियांनी मागितली विहीर यांनी दिला डबरा”, “गावातील महिला व पुरुष,आबाल वृद्ध व तरुण- तरुणी यांनी मागितला विकास सरपंच महोदयांनी गावच केला भकास”,गावातील पादचारी व सायकल,मोटर सायकल स्वार तसेच रिक्षा चालक मालक व चारचाकी मोटर चालक,ट्रक चालक टेम्पो चालक व एस.टी चालक ,एसटी प्रवासी व एस.टी.महामंडळ यांनी मागितले भक्कम व मजबूत रस्ते मात्र ग्रामसेवक व ग्रामपंचायतीने दिले खड्डे व खडकाळ रस्ते”, गाववासियांनी मागितले पाणी मात्र यांनी केली नळ योजनेच्या पाण्याची चोरी,पादचारी व ग्रामस्थ यांनी मागितली स्ट्रीट लाईट यांनी दिला अंधार”, ” गाववासियांनी मागितली भिक्षा यांनी केली आयुष्यभराची शिक्षा” अशीच काहीशी म्हणण्यापेक्षा अंगावर काटा उभा करणारी परिस्थिती सद्या कास या गावात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा पंधरवडा वस्ती संपर्क अभियान गुरुवारी सावंतवाडी बांदा मंडल कास या गावच्या समता नगर मध्ये पार पडले.यावेळी या वस्ती मधील ग्रामस्थांनी विकासा अभावी उद्भवत असलेले अनेक प्रश्न मांडले असता ही स्थिती समोर आली आहे.या वस्ती संपर्क अभियान भेटीवेळी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा समाज भुषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य चंद्रकांत जाधव,शक्ती केंद्र प्रमुख प्रवीण पंडीत,तालुका अध्यक्ष किशोर जाधव, अनुसूचित जाती मोर्चा बांदा मंडल समीर कीनळेकर व येथील ग्रामस्थ व महिला तसेच युवक उपस्थित होते.
चंद्रकांत जाधव यांनी ग्रामस्थ व महिला वर्ग यांना मागील 8 वर्षात देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी तयार केलेल्या व अंमलबजावणी केलेल्या अनेक योजनांची माहिती दिली. तसेच त्यांनी गावात न झालेल्या योजनांची माहिती करून घेतली.यावेळी ग्रामस्थ व महिला यांनी बैठकीला प्रतिसाद दिला. तर ग्रामस्थ बाबी सिताराम जाधव, आनंद जाधव,किशोर यशवंत जाधव,भैरव रामा जाधव, भिकाजी जाधव,गुरूनाथ जाधव,नारायण रामा जाधव,आशिष जाधव,गौरेश वासुदेव जाधव आदी ग्रामस्थ व यशोदा हरीजन,राधाबाई जाधव,सुनिता जाधव,सुभद्रा हरीजन,भाविका जाधव,अमीषा आनंद जाधव,विनंती वासुदेव जाधव, किशोरी जाधव,सीताबाई जाधव,जयश्री केशव जाधव,देवकी जाधव,यशोदा यशवंत जाधव,भाग्यश्री भैरव जाधव,वैष्णवी जाधव आदी महिला तसेच प्रचंड समस्या ग्रस्त समता नगर, कास मधील महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वस्ती संपर्क अभियान सेवा पंधरवडा या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जाधव आणि बांदा मंडल अध्यक्ष किशोर जाधव अनुसूचित जाती मोर्चा यांनी केले.समता नगर मधील मंदिर मध्ये पार पडलेल्या या बैठकीत येथे उभारण्यात आलेले नवे समाज मंदीर गेली 6 वर्षे झाली तरी अद्याप पुर्ण होत नाही.इतकेच नव्हेतर या अर्धवट स्थितीत असलेल्या समाज मंदीराची प्रत्यक्ष जागेवर चंद्रकांत जाधव यांनी कोकण लाईव्हचे सावंतवाडी प्रतिनिधी सुखदेव राऊळ यांच्या समवेत जाऊन गूरुवार दिनांक 29 सप्टैंबर रोजी पहाणी केली असता या समाज मंदिराचे बांधकाम हे सिमेंट काँक्रीट बांधकामाची पद्धत व नियम बासनात गुंडाळून व बांधकामाची फसवणूक केल्याचे दिसून आले.
ही इमारत नवीन असून या समाज मंदीरामध्ये कचरा जमा होण्याबरोबरच पक्षांची विष्टा,पंख पसरून प्रचंड दुर्गंंधी पसरली असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळाले.पत्रकार सुखदेव राऊळ यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यातून चित्रिकरण कैले असून या वृत्तासहीत समोर आणले आहे.
यामुळे कास गावातील समता नगर मधील ग्रामस्थ अद्याप समाज मंदिरा अभावी वंचित आहेत. तसेच समाज मंदीराचे एकूण कायच निकृष्ठ दर्जाचे करण्यात आल्याचे लज्जास्पद वास्तव असून या समाजमंदिरामध्ये विद्युत जोडणीही करण्यात आलेली नसून बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले असल्याने वाळवी लागणे,भिंतीना तडे जाणे,रंगकामाला पापूद्रे आल्याचे,पावसाचे पाणी भिंती व छतातून पाझरुन काळी बुरशी भिंतीवर निर्माण झाल्याने ही बैठी इमारत कमकुवत होणार असल्याचे दिसत आहे.
शासनाने या इमारतीसाठी दलित बौद्ध सुधार वस्ती योजने अंतर्गत 10 ते 12 लाख रुपये एवढा निधी देऊन सुध्दा 6 वर्षे झाली तरी समाज मंदीर पुर्ण होत नाही, हे कास वासीयांचे दुर्देवच म्हणावे लागेल अशी स्थिती आहे.इतकेच नव्हेतर हे समाज मंदिर व समाज मंदिराचे एकूण बांधकाम,इमारतीची उंची,लांबी-रुंदी व दिशा याचे कोणतेही नियम पाळले गेले नसल्याचेच दिसते.या एकूण स्थितीवरुन वास गावचे सरपंच यांनी हे काय कैले आहे? आता सद्या ते काय करत आहेत?हे समाज मंदीर वापरा योग्य बनवून त्याचे लोकार्पण ते कधी करणार आहेत? की ते ही इमारत कोसळून मातीत मिसळण्याची वाट पाहून निकृष्ट कामाचे व या बांधकामाचे पुरावे नष्ट करण्याची प्रतिक्षा करत आहेत का? आसे आणि विविध प्रश्न हे बांधकाम पाहून कोणालाही पडल्या शिवाय
रहाणार नाहीत अशीच स्थिती दिसत आहे.
हे पडीक ठरत असलेले हे समाज मंदिर पहाता कास सरपंच यांनी समाजाची पुर्णपणे फसवणूक केली असल्याचाच दाट संशय वाटत असून म्हणूनच येथील ग्रामस्थांनी या बांधकामाची, रक्कम किती मिळाली,बांधकामासाठी किती रक्कम वापरली? किती रक्कम कोणी कोणी गिळंकृत केली?असे प्रश्नही या अनुषंगाने उपस्थित होत आहेत.
समाजमंदिर बांधकामात भ्रष्टाचार झालेल्या या बांधकामासहीत समाज मंदिराकडे येणारा रस्ता,समाजमंदिर सभोवतालचा परिसर , समाज मंदिराच्या सभोवतालची वाढलेली झाडी,जिकडे तिकडे पसरलेला कचरा इतकेच नव्हेतर गावातील रस्ते,गावातील इतर अनेक कामे, या समाज मंदिरा समोर बांधण्यात आलेली विहिर, वस्ती मध्ये विकास कामाचा कुठेही मागमूस नसणे आदी दारुण स्थिती पहाता कास हे गाव नक्की सावंतवाडी तालुका,सिंधुदूर्ग जिल्हा,महाराष्ट्र राज्यातलेच आहे की? कुठच्या अतिदुर्गम भागातील,अविकसीत देशातील आहे का?की या वाडीला की या गावाला समता नगरला वाळीत टाकण्यात आले आहे? असे प्रश्नही पडत आहेत.
याबाबत कोकण लाईव्ह तर्फे चंद्रकांत जजाधव व उपस्थिताना गुरुवारी करण्यात आलेल्या पहाणी नंतर विचारणा करण्यात आली असता,”आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाअधिकारी यांना भेटुन व पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना भेटुन दोषी ठेकेदार व संबधित यांची चौकशी लावून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कडक कारवाई व्हावी यासाठी मंगळवारी जिल्हा अधिकारी यांची भेट घेणार आहोत.कास गावातील समाजाला न्याय मिळवून दिल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,असे चंद्रकांत जाधव जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा तथा समाज भुषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र यांनी कास गावातील ग्रामस्थ व महिलांना शब्द दिला आहे. यावेळी शक्ती केंद्र प्रमुख प्रवीण पंडीत. किशोर जाधव सावंतवाडी मंडळ अध्यक्ष बांदा अनुसूचित जाती मोर्चा,बुथ अध्यक्ष समीर कीनळेकर यांनीही यासाठी आम्ही वेळ पडल्यास शासन दरबारी व न्याय दरबारी न्याय मागू असा इशारा दिला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_
*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳
🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_
*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*
*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*
*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*
*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*
*👩🏻🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*
*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*
*🧸टेडी बियर 🪆*
*🕶️सनग्लास👓🥽*
*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣
*अटी व नियम लागू*
*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग
📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

