सावंतवाडी शहरात सुरु झाला “मिशन रेबीज”उपक्रम
सावंतवाडी शहरात भटक्या कुत्र्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून याबाबत अनेक सामाजिक संस्था, माजी नगरसेवक, विविध संघटना यांनी सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन वारंवार लक्ष वेधले होते.वर्ल्ड रेबिज डे च्या पार्श्वभूमीवर बुधवारी सावंतवाडी शहरात ‘मिशन रेबिज ‘ राबविण्यात आले. ‘मिशन रेबीज या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सावंतवाडी नगरपालिकेच्या मच्छी मार्केट कडून हा उपक्रम सुरू करण्यात आला. शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना रेबीज प्रतिबंधक लस टोचण्यात येत आहे. पुढील काही दिवस हे मिशन राबविण्यात येणार असून नागरिकांनी आपल्या पाळीव कुत्र्यांनाही रेबीज प्रतिबंधक लस टोचून घ्यावी, असे आवाहन नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
.

