कोकणसामाजिक

“आधी तोरण गडाला मग माझ्या दाराला”-दुर्ग सैवकांचा अभिनव उपक्रम!

 

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग सावंतवाडी तालुका तर्फे दसऱ्यानिम्मीत दुर्ग पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांचा पूजन सोहळा आयोजीत

 

सावंतवाडी (सुखदेव राऊळ)

 

“आधी तोरण गडाला मग माझ्या दाराला” असा अभिनव उपक्रम सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दुर्ग सैवकांनी हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग सावंतवाडी तालुका’ तर्फे दसऱ्यानिम्मीत दुर्ग पूजन आणि “छत्रपती शिवाजी महाराजांच्या” स्मारकांचा पूजन सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.

हा उपक्रम दसऱ्याच्या दिनी 5 आक्टोंबर 2022 रोजी होणार असून या उपक्रमाअंतर्गत बांदा किल्ला, बांदा शिवस्मारक,सावंतवाडी येथील शिवस्मारक,मळगांव येथील शिवस्मारक,निरवडे येथील शिवस्मारक,चराठा येथील शिवस्मारक,आंबोली गेळे सतीवाडी येथील शिवस्मारक,सावंतवाडी बस स्टँड वरील तोफांचे पुजन,सावंतवाडी नगरपालिकेजवळील तोफांचे पुजन आदी ठिकाणी स्मारक पुजन सोहळा होणार आहे.

सर्व दुर्गसेवकांनी शिवप्रेमींनी आणि शिवकन्यांनी सहभागी व्हावे व इतिहासाची पुनरावृत्ती करूया असे आवाहन करण्यात आले आहे.या उपक्रमाबाबत‌अधिक माहितीसाठी सुनिल राऊळ – 9637826315 ,दिनेश सावंत – 9404759110,शैलेश गावडे – 8975828114 व सुधीर राऊळ – 9765320990 यांच्याशी संपर्क साधावा व शासनाने दिलेले नियम पाळून विजयोदूर्गोत्सव साजरा करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!