कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 जिल्ह्यातील बहूतांशी शाळा शिक्षका विना असल्याचे वास्तव आहे..या स्थितीला जबाबदार कोण?

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-२५:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहूतांशी शाळा शिक्षका विना असल्याचे वास्तव आहे.या स्थितीला जबाबदार कोण? असे चिंतनीय प्रश्न निर्माण झाले आहे. मागील 10 वर्षे अनेक शाळांमधील भरती प्रक्रिया रखडली आहे.यामुळे शाळांमधील अद्यापनाचे काम विस्कळीत झाले आहे.
एकेठिकाणी गुरू हाच शिक्षणाचा पाया मानला जातो.गुरूच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी प्रगतीचे पुढील पाऊले टाकत असतो.पण गेली 10 वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती प्रक्रिया घेण्यात आलेल्या नाहीत.प्रत्येक डी. एड व बी
एड केलेल्या अध्यापकांची नितांत गरज असते. मात्र अनेक शिक्षक व शिक्षिकांची भरती केली जात नाही.यामुळे डी.एड किंवा बी.एड. केले अनेक शिक्षक व शिक्षिका भविष्यात आपण कधीना कधी कुठच्या ना कुठच्या शाळेचे शिक्षक होणार असे स्वप्न बाळगून असतात. डी.एड. व बी.एड पुर्ण करणारे शिक्षक व शिक्षिका याच धरतीवर हे प्रशिक्षण पूर्ण करत असतात. यामध्ये शिक्षक कसा असावा, विद्यार्थ्यां पोटी त्याच्या मध्ये असलेली आत्मीयता तसेच विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण अवगत करणे गरजेचे आहे .या आणि अशा सगळ्याच गोष्टी या अध्ययन व अध्यापन प्रशिक्षणामध्ये शिकवल्या जातात. परंतु गेल्या 10 वर्षात सरकारने म्हणा किंवा अन्य कोणी जो जो टीइटी जो सपाटा लावला त्यामुळे भरती प्रक्रिया रखडली.तरीही असे असूनही कदाचित त्यात पैसे कमी पडले म्हणून की काय सरकारने नवीन नियम काढला की शिक्षक भरती ही अभियोग्यता चाचणी घेऊन व्हावी.याबाबत 2017 मध्ये जीआर निघाला होता.या जीआर मध्ये नमूद केल्या प्रमाणे दर 1 वर्षांनी पवित्र पोर्टल द्वारे भरती करणे आवश्यक आहे. मात्र असे असून देखील 2017 मध्ये एकदाच चाचणी घेण्यात आली. मात्र त्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे बऱ्याच शाळेत असे शिक्षक आहेत जे तुटपुंज्या मानधनावर संस्था स्तरावर काम करताना दिसत आहेत.
यामुळे जर पवित्र पोर्टल द्वारे शिक्षकांची निवड होत असेल तर सध्या जे शिक्षक कमी पगारावर काम करत आहेत.त्यांना त्याच शाळेमध्ये नोकरी भेटेल हे सांगता येत नाही. तसेच 10 वर्ष बंद असलेल्या व जे शिक्षक एवढी वर्ष काम करत आहेत. त्यांची भरतीची वये निघून गेली आहेत.काहींनी तर वेगळाच धंदा स्वीकारला आहे. इतकेच नव्हेतर भरती रखडल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
वास्तविक शिक्षक समायोजन हे वर्षानुवर्षे होतच आहे. मात्र हे समायोजन चुकीचे ठरत आहे. यामुळे निदान विज्ञान, गणित व इंग्रजी या विषयात तज्ञ असतील तर त्यांची तरी भरती ही 2014 मध्ये आलेल्या जी आर नुसार करावी. कारण अशा कोणत्याच शाळेत या विषयाचे शिक्षक असल्याचे सत्य आहे.तर सिंधुदुर्गातील अनेक बेरोजगार शिक्षक आजही बेकार असून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या या बेरोजगार शिक्षकांना नोकरीत सामावून घेतल्यास अपूऱ्या शिक्षकांची कमतरता दूर करण्याची गरज आहे.

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!