यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्षाचा निकाल १०० टक्के..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.०६: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला असून यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या तीनही विभागांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यापैकी तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल विभागातून शुभांगी कवठणकर हिने ९१.६१ टक्के गुण मिळवून प्रथम, अथर्व गाडगीळ ९१.२८ टक्के याने द्वितीय, आत्माराम सावंत याने ९०.२८ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागातून विवेक गोसावी याने ९०.८७ गुण मिळवून प्रथम, नंदिता केरकर ८६.४६ टक्के हीने द्वितीय तर संकेत पडकील याने ८५.७९ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. तृतीय वर्ष सिव्हील विभागातून सेजल दळवी हिने ९२.४२ टक्के गुण मिळवून प्रथम, प्रथमेश महाले ८९.४७ टक्के द्वितीय व श्रुती वाळके हीने ८७.९५ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर अंतिम सत्राची परीक्षा बोर्डाने ऑनलाईन पद्धतीने घेतली होती.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत-भोसले, कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, सचिव संजीव देसाई व प्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
*💥……… प्रवेश सुरु ……… 💥*
_🌈तंत्र शिक्षण क्षेत्रात करियर करण्याची संधी.._
*🔥डिप्लोमा इन इलेक्ट्रिशीयन🔥*
_💫कालावधी – १ वर्ष_
_💫शैक्षणिक पात्रता – किमान १० उत्तीर्ण_
*🤷🏻♂️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*इन्स्पायर एज्यूकेशन, सावंतवाडी (7466A)*
*_📱संपर्क : 9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_