🟥 निश्चित प्लॉटधारक शेतकर्यांसाठी कृषि विभागातर्फे उपविभागस्तरीय एकदिवशीय प्रशिक्षण संपन्न
Kokan Live Breaking news
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-२०:-* महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) “आंबा व काजू पिक” सन २०२२-२३ अंतर्गत, सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील निश्चित प्लॉटधारक शेतकर्यांसाठी उपविभागस्तरीय एकदिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा दि. १९.०९.२०२२ रोजी श्रीराम वाचन मंदिर सभागृह, सावंतवाडी येथे संपन्न झाली.
या कार्यशाळेस प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील कीटकशास्त्रज्ञ व हॉर्टसॅप प्रकल्प समन्वयक डॉ. विजयकुमार देसाई, डॉ. अजय मुंज (किटकशास्त्रज्ञ) डॉ. गोपाळ गोळवणकर (संशोधन सहयोगी), श्री. प्रमोद बनकर (सावंतवाडी तालुका कृषि अधिकारी), श्री. विजयकुमार वाघमारे (मंडळ कृषि अधिकारी सावंतवाडी १) , श्री. यशवंत गव्हाणे (मंडळ कृषि अधिकारी सावंतवाडी २) व श्री. प्रकाश घाडगे (मंडळ कृषि अधिकारी बांदा ३) हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. प्रमोद बनकर यांनी या कार्यशाळेचा उद्देश व महत्व यासोबत कृषि विभागाच्या इतर योजनांबाबत विस्तृत माहिती दिली. या कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार देसाई यांनी काजू पिकावरील किडी-रोगांची ओळख व नियंत्रण आणि आंबा पिकावरील रोगांची ओळख व नियंत्रण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. अजय मुंज यांनी आंबा पिकावरील महत्वाच्या किडींची ओळख व नियंत्रण याविषयी व डॉ. गोपाळ गोळवणकर यांनी आंबा पिकावरील इतर दुय्यम किडींची ओळख व नियंत्रण या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शेतकरी प्रतिनिधी श्री. श्रीकृष्ण गोरे यांनी या कार्यशाळेतील ज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी उपयोग आपल्या आंबा व काजू बागेच्या संरक्षणासाठी करावा याचे आवाहन केले.
या कार्यशाळेला अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या भेडसावणर्या समस्या व प्रश्न विचारून त्यावर सखोल चर्चा केली. सदर कार्यशाळेस एकूण ४५ शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित कृषि विभागाच्या अधिकारी वर्ग व शेतकर्यांना आंबा पीक संरक्षण पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश घाडगे व आभार प्रदर्शन श्री. विजयकुमार वाघमारे यांनी केले.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_
*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳
🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_
*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*
*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*
*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*
*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*
*👩🏻🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*
*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*
*🧸टेडी बियर 🪆*
*🕶️सनग्लास👓🥽*
*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣
*अटी व नियम लागू*
*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग
📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

