कोकण कन्या एक्सप्रेस आता सुपरफास्ट
कोकण कन्या एक्सप्रेस आता सुपरफास्ट
कणकवली, दि.२०: कोकणवासीयांसाठी हक्काची असणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेस आता सुपरफास्ट होणार असून एकूण प्रवासाच्या वेळेत २ तास १० मिनिटांची बचत होणार आहे. एक्सप्रेस मधून सुपरफास्ट श्रेणीत या गाडीला बढती देण्यात आली आहे. कोकणकन्या सुपरफास्टचे नवे वेळापत्रक २० जानेवारी २०२३ पासून लागू होणार आहे. तसेच गाडीचा क्रमांकही बदलण्यात आला आहे.
कोकणकन्या एक्सप्रेस आज २० सप्टेंबर पासून विद्युत इंजिनासह धावत आहे. यात कोकणकन्या एक्सप्रेसची गतीही वाढणार आहे. दरम्यान कोकणकन्या एक्सप्रेस ही गाडी आज पासून विद्युत इंजिनासह धावत असली तरी नवे वेळापत्रक २० जानेवारी २०२३ पासून लागू होणार असल्याची माहिती कोकण रेल्वे कडून देण्यात आली.
मुंबई सीएसएमटी ते मडगाव जंक्शन या दरम्यान १०११२/१०१११ या ट्रेन क्रमांकाने कोकणकन्या एक्सप्रेस धावत आहे. आता २० जानेवारी २०२३ पासून कोकणकन्या सुपरफास्ट एक्सप्रेस ००१०२/२०१११ या क्रमांकाने ही गाडी दररोज धावणार आहे.
मडगाव ते मुंबई सीएसएमटी (गाडी क्र. २०११२) : मडगाव – सायं. ७.००, करमळी ७.४२, , थिवीम ९.००, पेडणे ८. १२, सावंतवाडी ८.३६, कुडाळ ८.५८, सिंधुदुर्ग ९.१२, कणकवली ९.२८, वैभववाडी ९.५४, रत्नागिरी ११.१५, चिपळूण मध्यरात्री १२.३०, पनवेल पहाटे ३.५५, ठाणे ४.४२, दादर ५.१२, सीएसटीएम ५.४०.
सीएसटीएम ते मडगाव (गाडी क्रं. २०१११) : सीएसएमटी रात्री ११.०५, दादर ११.१७, ठाणे ११.४५, पनवेल मध्यरात्री १२.२५, चिपळूण पहाटे ३.३०, रत्नागिरी ४.४५, वैभववाडी ६.१०, कणकवली ६.४२, सिंधुदुर्ग ७.००, कुडाळ ७.१२, सावंतवाडी ७.३२, पेडणे ७.५६, थिवीम ८.१०, करमळी ८.३२ आणि मडगाव ९.४६.

