🟥 आजगाव, मळेवाड, धाकोरा परिसरात हानिकारक प्रकल्प नको राजन मुळीक
*🟥 ग्रामस्थांचा तीव्र विरोध, अन्यथा आंदोलनाचा इशारा..*
*🎥Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१८ :-* सावंतवाडी तालुक्यातील आजगाव, मळेवाड, धाकोरा ग्रामपंचायत हद्दीत पर्यावरणाला हानी पोहोचविणारा एक खनिज प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे परिसरातील भातशेती तसेच घरांचीही हानी होणार असल्याने याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे आजगाव, मळेवाड, धाकोरा ग्रामपंचायतने अशा पर्यावरणास हानीकारक ठरणाऱ्या प्रकल्पाला परवानगी देऊ नये अन्यथा तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा जिल्हा परिषद माजी सदस्य राजन मुळीक यांनी दिला आहे.
आजगाव ग्रामपंचायत हद्दीत 11.4 किलो मीटर क्षेत्रफळावर एका खनिज कंपनीचा प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे.त्याच्या सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी आजगाव ग्रामसभेकडून एनओसी आवश्यक आहे. मात्र पूर्वेक्षण करताना अनुदान क्षेत्रातील जमीनीचे तसेच परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार. कारण संभाव्य खनिज क्षेत्रामध्ये ड्रिलिंग होणार असून भविष्यात याचे परिणाम धोकादायक होणार असल्याने याला जबाबदार कोण राहणार असा सवाल राजन मुळीक यांनी केला.अशीच प्रक्रिया मळेवाड, धाकोरा मध्येही सुरू असल्याचे श्री. मुळीक यांनी सांगितले.
मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघात यापूर्वीच खनिज कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या बागायती, भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु नंतर भरपाई देण्याची वेळ आली तेव्हा नैसर्गिक आपत्तीचे कारण सांगत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते. शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवणाऱ्या अशा प्रकल्पांना स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविला असल्यामुळे असे पर्यावरणास हानी पोहचविणारे प्रकल्प आजगाव, मळेवाड, धाकोरा परिसरात नको अशी मागणी जिल्हा परिषद माजी सदस्य राजन मुळीक यांनी केली आहे.
प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात न घेता जर सदर खनिज प्रकल्पाला मान्यता दिल्यास ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल. तसेच कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास करणारा प्रकल्प होऊ देणार नाही. परिणामी आम्हाला आंदोलन छेडावे लागेल असा इशारा राजन मुळीक यांनी दिला.
*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴
🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓
⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*
🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )
_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास
📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*
🔍 *www.mitm.ac.in*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

