कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

उद्योग मंत्री उदय सामंत यांना भर सभेत जाळून मारण्याची धमकी देणाऱ्या आप्पा जोशींचा प्रतिकात्मक पुतळा दहन

उद्योग मंत्री उदय सामंत यांना भर सभेत जाळून मारण्याची धमकी देणाऱ्या आप्पा जोशींचा प्रतिकात्मक पुतळा दहन

कणकवली : उद्योगमंत्री उदय सामंत यांना जिवंत जाळून मारण्याचे भर सभेत वक्तव्य करणाऱ्या अप्पा जोशी यांचा प्रतिकात्मक पुतळा शिंदे शिवसेना गटाकडून जाळण्यात आला. कणकवली मध्यवर्ती शाखेसमोर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अप्पा जोशी यांचा निषेध केला.
जोशी यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. यावेळी माजी जि. प. सभापती संदेश पटेल, सुनील पारकर, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, शेखर राणे, दामू सावंत, बाळू पारकर, दिलीप गावकर, प्रमोद सांगवेकर, दीपक राऊत, सुनील हरमलकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!