कोकणमहाराष्ट्रराजकीयवेंगुर्लेसिंधुदुर्ग

फिशिग व्हिलेज राज्यात आदर्श ठरेल!- दिपक केसरकर

फिशिग व्हिलेज राज्यात आदर्श ठरेल!- दिपक केसरकर

वेंगुर्ला प्रतिनिधी- नवाबाग फिशिग व्हिलेजसाठी प्रस्तावित असलेल्या १९ गुंठे शासकीय जागेची पहाणी राज्याचे शिक्षणमंत्री तथा सिधुरत्न योजनेचे अध्यक्ष दिपक केसरकर यांनी शुक्रवारी फिशरीजच्या अधिका-यांसोबत पहाणी केली. नवाबाग फिशिग व्हिलेज राज्यातील एकमेव आदर्श फिशिग व्हिलेज ठरेल असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.

नवाबाग येथील ब्रेक वॉटरचे काम एक महिन्यात सुरु होईल. मच्छिमारांना मासे वाळविण्यासाठी चांदा ते बांदा योजनेमधून सोलर देण्यात येतील अशीही माहिती श्री.केसरकर यांनी दिली. तर नवाबाग बंधा-यावर बांधण्यात आलेला पादचारी मार्ग पुढे झुलत्या पुलापर्यंत नेण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. यावेळी सहाय्यक मत्स्य आयुक्त रविद्र मालवणकर, परवाना अधिकारी चिन्मय जोशी, तहसिलदार प्रविण लोकरे, पोलिस निरिक्षक अतुल जाधव, नायब तहसिलदार संदिप पाणमंद, उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर, उपसरपंच गणपत केळुसकर, मच्छिमार सोसायटीचे चेअरमन राजेंद्र कुबल, रामचंद्र आरावंदेकर, प्रकाश मोटे, दशरथ तांडेल, संजू कुबल, हनुमंत कासकर, देविदास मोठे, बाळू कुबल, नाना सावंत, दादा केळुसकर, सुधाकर वेंगुर्लेकर, अशोक खराडे, सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर आदी उपस्थित होते.

फोटोओळी – राज्याचे शिक्षणमंत्री तथा सिधुरत्न योजनेचे अध्यक्ष दिपक केसरकर फिशरीजच्या जागेची पहाणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!