*जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडून पोलीस कर्मचाऱ्यांना गणपतीची भेट
*जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडून पोलीस कर्मचाऱ्यांना गणपतीची भेट*
*जिल्ह्याच्या पोलीस दलातील 157 पोलीस कर्मचाऱ्यांना बढती*
*प्रतिनिधी सुनील आचरेकर*
*सिंधुदुर्गनगरी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिसांना गणपती पावला असून जिल्ह्यात पोलीस दलातील 157 पोलीस कर्मचाऱ्यांना बढती देण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी बढतीचे आदेश काढले. पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस फौजदार व पोलीस नाईक ते पोलीस हवालदार यांना पदोन्नती बढती देण्यात आली असून बढतीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी काढले आहेत पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 27 पोलीस नाईक ते पोलीस हवालदार 130 आदींचा या बढतीमध्ये समावेश आहे. खुल्या प्रवर्ग व राखीव प्रवर्गातून या बढत्या देण्यात आल्या आहेत. या पुढील कित्येक वर्ष बढत्या रखडलेल्या होत्या मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना खुश केले असून पुढील कित्येक वर्ष रखडलेल्या बढत्या देण्यात आल्याने पोलीस कर्मचाऱ्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

