कोकणमहाराष्ट्रवैभववाडीशैक्षणिकसिंधुदुर्ग

🟥 मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात वैभववाडी महाविद्यालयाचे यश

*🎥 Kokan Live Breaking News*

*🎥 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वैभववाडी, दि-२६:-* मुंबई विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव दिनांक २४ ऑगस्ट रोजी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे मोठा उत्साहात संपन्न झाला. या युवा महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील एकूण ३६ महाविद्यालयांमधील ५१० विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कला प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवून आपला कलाविष्कार सादर केला. वैभववाडीच्या आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी देखील विविध कला प्रकारांमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये प्रथम कला वर्ष शाखेतील विद्यार्थी कु. हर्ष संजय नकाशे याने भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय सुगम गायन व नाट्यसंगीत या कला प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक, तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थिनी कु. अंजली शिवराम चव्हाण व एम.कॉम. ची विद्यार्थिनी कु. तेजस्वी रावराणे यांनी वादविवाद स्पर्धा गट अ मध्ये प्रथम क्रमांक, कु. अंजली चव्हाण हिने वक्तृत्व स्पर्धा गट ब (हिंदी किंवा इंग्रजी) मध्ये द्वितीय क्रमांक, एम.कॉम. चा विद्यार्थी कु. अक्षय सुतार याने वक्तृत्व स्पर्धा गट अ (मराठी) मध्ये तृतीय क्रमांक व भारतीय लोकनृत्यामध्ये महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला. या लोकनृत्यामध्ये महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनी कु.आशा पाटील, कु. आकांक्षा कदम, कु. हर्षदा भूतल, कु. निकिता चव्हाण, कु. सिद्धी माईणकर तसेच प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनी कु. सानिका मुद्रस, कु. सायली पाष्टे, कु.समिधा पेडणेकर, कु. श्रेणी पाटणकर व कु. कामेश्वरी गुरव सहभागी झाल्या होत्या. महाविद्यालयातील इतरही काही विद्यार्थ्यांनी मेहंदी, पोस्टर मेकिंग, ऑन द स्पॉट पेंटिंग, वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटल, वेस्टर्न वोकल सोलो, स्वरवाद्य व तालवाद्य अशा अनेक कला प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी व महाविद्यालयाकडून अभिनंदन करण्यात येत आहे. हे यश मिळवण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व प्राध्यापकांनी विशेष प्रयत्न केले.

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

*🧸टेडी बियर 🪆*

*🕶️सनग्लास👓🥽*

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

*अटी व नियम लागू*

*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!