🟥 मळगांव देऊळवाडी येथील माळीचेघरची गोकुळाष्टमी उत्साहात साजरी..
*🟥 भजन व टाळ फुगडी घालून साजरा केला गोपाळ काला..*
*🟥 नोकरी व्यसायानिमीत्त व शेती वाडी निमित्त अन्य ठिकाणी व शहरात वास्तव्य करणाऱ्या भावबंधांकडून जय श्री गोपाळ कृष्ण महाराज व श्री देव घरवडकर देवाचे दर्शन!..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-१९:-* राऊळ घराणे म्हणून मळगांव पंचक्रोशी व दशक्रोशीसहीत सातासमुद्रापार प्रसिद्ध असलेल्या मळगांव देऊळवाडी येथील माळीचेघरची गोकुळाष्टमी गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माळीचेघरातील सर्व वारसी अर्थात भावबंध जे मळगांव मध्ये देऊळवाडी, गोवळवाडी, तेलकाटे तसेच अन्य ठिकाणी नोकरी व्यसायासाठी ,शेती वाडी निमित्त वास्तव्य करतात त्यांनी एकत्र जमून जय श्री गोपाळ कृष्ण व श्री देव घरवडकर देवाचे दर्शन घेतले.
ब्राम्हणामार्फत विधीवत पुजा करुन श्री गोपाळ कृष्णाला नैवेद्य दाखविण्यात आला. तसेच श्री देव घरवडकर महाराज, इसवटी अवगती, ग्रामदैवता रवळनाथ-भुतनाथ-मायापुर्वचारी, सोनुर्ल
माऊली, मठाधिपती स्वामी समर्थ महाराज व इस्ट देवतांना गाऱ्हाणे घालण्यात आले. तसेच सर्वाना तिर्थ प्रसाद वाटप करण्यात आले. तसेच यावेळी आरती व श्री देव घरवडकर भजन मंडळातर्फे सुश्राव्य भजन सादर करण्यात आले. या भजनात माळीचेघर मधील भजनी बुवा व कोरसमणी यांनी सहभाग घेतला.
तर शुक्रवारी गोपाळकाला व कृष्ण मुर्ती विसर्जन दिनी सकाळी माळीचेघर मधील बाल गोपाळ व युवकांनी भजन करण्या बरोबरच, हातात टाळ घेऊन गोल फुगडी घालून गोपाळकाला घातला. तसेच सालाबादप्रमाणे श्री बाल गोपाळ मुर्तीचे विसर्जन टाळाच्या गजरात देऊळवाडी येथील कृष्णा कोंडीत करण्यात आले.
*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*💥 बंपर ऑफर बंपर ऑफर💥*
*🟥 आता पेट्रोल फ्री फ्री फ्री*
*🏍️ 150cc पर्यंतच्या कोणत्याही 🛵 टू व्हीलर इन्शुरन्स वर 1️⃣ लिटर पेट्रोल फ्री*
*🔴 🚕फोर व्हिलर 🚙थर्ड पार्टी इन्शुरन्स वर 2️⃣ लिटर पेट्रोल फ्री🆓*
*🔴 त्वरा करा ऑफर काही कालावधी साठी*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

