मागील 15 ते 20 दिवसांपासून न्हावेली गावात वीजेचा लपंडाव
मागील 15 ते 20 दिवसांपासून न्हावेली गावात वीजेचा लपंडाव
न्हावेलीसाठी स्वतंत्र वायरमन नसल्याने मोठी गैरसोय
ग्रामस्थांकडून सहाय्यक अभियंता, सावंतवाडी यांना निवेदन सादर
सावंतवाडी ( सुखदेव राऊळ)
गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र या स्थितीत सावंतवाडी तालुक्यातील 900 ते 1000 हून अधिक निवासी घरे व 100 हून व्यावसायिक दुकाने व हाॅटेल तसेच कंपन्या आहेत.तेवढे वीज ग्राहक असलेल्या या 2500 हून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावात विजेचा खेळखंडोबा सुरु आहे.वाहिन्यांना चिकटणारी झाडी झुडपे त्रासदायक ठरत आहेत.यामुळे वेळी अवळी वीज गायब होत आहे.वीजेच्या या समस्या संदर्भात विचारणा केली असता वायरमन (वीज जोडणी धारक) कडून उध्दट उत्तरे मिळत असल्याने न्हावेली येथील ग्रामस्थांकड होत आहे. तसेच हे वायरमन अर्धवेळ गावात उपलब्ध असल्याने तर कधी कधी अजिबात गावात फिरकत नसल्याने वीज ग्राहकांना मोठी गैरसोय सोसावी लागत आहे.
यामुळे न्हावेली ग्रामस्थ मोहन नारायण पालेकर, संतोष रामकृष्ण फणसेकर,सुहास दिगंबर आचरेकर, अनिल कृष्णा शेटकर, अविनाश लक्ष्मण कालवणकर,प्रसाद प्रकाश गावडे, प्रशांत कांबळी, दिपचंद्र हरमलकर आदींनी सहाय्यक अभियंता, सावंतवाडी यांच्या कडे सोमवार दिनांक 8 आॅगस्ट 2022 रोजी सादर केलेल्या लेखी निवेदनात, या मागणी अंतर्गत तत्काळ दखल घेऊन न्हावेली गावासाठी स्वतंत्र वायरमनची नियुक्ती करावी,अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.गावातील विजेसंदर्भात तक्रारीसाठी ठेवण्यात आलेले तक्रार बुक 2017 पासून वायरमनने पाहिलेले सुध्दा नसल्याची किंवा तक्रार निवारण केल्याचा कोणताही उल्लेख नाही, असेही येथील ग्रामस्थांकडून या नोंद वहीत नमूद करण्यात आले आहे.या नोंद वहीत,वीज वाहिन्यांना लागणारी झुडपे प्रशासनाने सफाई न केल्यामुळेच हा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याची नोंद या वहीत आहे.याचा परिणाम नळपाणी योजनेवर होत असून भर पावसळ्यात पाण्यासाठी महिलांना विहिरीवर जावे लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वाहिन्यांना लागणारी झाडी झुडपे न तोडल्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. वीजबिल वेळेवर भरुनही अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने आम्हांला लोकशाहिचा मार्ग पत्करावा लागणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्वरीत समस्या निवारण न झाल्यास तीव्र आंदोलन उभे करावे लागेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

