तिलारी येथील गुराखी लोबो यांना आढळले दुर्मीळ जातीचे भारतीय तारा कासव*
*तिलारी येथील गुराखी लोबो यांना आढळले दुर्मीळ जातीचे भारतीय तारा कासव*
दोडामार्ग -सौ प्रांजल गवस.
जैवविविधतेने नटलेल्या तिलारी परिसरात पाताडेश्वर मंदिरा नजीक भारतीय तारा जातीचे कासव गुराखी इज्माईल लोबो,एलियस लोबो यांना आढळले अशाप्रकारचे कासव दृष्टीस पडल्याचे समजताच त्यांनी तत्काळ कोनाळ येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले,वन विभागाचे अधिकारी श्री.शिरवलकर , मुकावे,व रामराव लोंढे दाखल झाले, परिसरातील नागरिकांनी कासव पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

