“जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती आमदार केसरकर यांच्यावर साळगावकरांची टीका
“जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती
आमदार केसरकर यांच्यावर साळगावकरांची टीका
सावंतवाडी,दि.०५: राणेंसोबत आपण काम करण्यास तयार, असे वक्तव्य आमदार दीपक केसरकर यांनी केल्यानंतर त्यांच्यावर जिल्ह्यात टिका झाली. त्यामुळे त्यांनी आज राणें विषयी केलेले वक्तव्य म्हणजे “जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती” असे आहे, अशी टिका सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. आपली घसरलेली पत भरुन काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे केसरकर आता शिंदे गटाशी किती दिवस प्रामाणिक राहतील यात शंका आहे, अशी टीका साळगावकर यांनी केली आहे..काही काही वेळा आमदार दीपक केसरकर अंगलट आले की उपरती आठवते असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत श्री. साळगावकर यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.

