: न्यू- सबनीसवाडा येथील सानिया इन्व्हर्टर या दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या सुमारे ३८ हजार रुपये किमतीच्या तीन बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्या
सावंतवाडी,दि०२: न्यू- सबनीसवाडा येथील सानिया इन्व्हर्टर या दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या सुमारे ३८ हजार रुपये किमतीच्या तीन बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्या आहेत. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान संबंधित चोरटा सीसीटीव्ही कैद झाला असून त्यांने तासाभराच्या फरकाने दोन वेळा येऊन हा प्रकार केला, अशी माहिती दुकानाचे मालक संतोष तळवणेकर यांनी दिली. तर याबाबत आपण सावंतवाडी पोलिसात तक्रार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
घटनेची अधिक माहिती अशी की, श्री. तळवणेकर यांनी संबंधित बॅटऱ्या आपल्या दुकानाच्या बाहेर ठेवल्या होत्या. दरम्यान सकाळी त्याठिकाणी त्या आढळून आल्या नाही. त्यामुळे त्यांनी आपले सीसीटीव्ही तपासले. यावेळी तोंडाला बुरखा बांधून अज्ञात व्यक्ती त्या नेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तर संबंधित व्यक्ती तासाभराच्या फरकाने दोन वेळा येऊन बॅटऱ्या घेऊन जाताना दिसून आली. चोरीला गेलेल्या बॅटऱ्यांमध्ये १७ हजार, ९ हजार व १२ हजार आदींचा सामावेश आहे. दरम्यान आपण याबाबत सावंतवाडी