आमदार वैभव नाईक यांनी घेतली माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट
आमदार वैभव नाईक यांनी घेतली माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट
आमदार वैभव नाईक यांच्या भेटीमुळे शहरात राजकीय चर्चेला उधाण
सावंतवाडी -आज दिनांक 30 जुलै 2022 रोजी दुपारी एक वाजता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तसेच मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या गुरुकुल मध्ये येऊन साळगावकर यांची भेट घेतली या भेटीमुळे राजकीय समीकरणे बदलणार का? या चर्चेला उधाण आले आहे,शिवसेनेला सावंतवाडी नगरपरिषदेत एक सर्वसमावेशक चेहरा हवा आहे,व त्या दृष्टीने शिवसेना नेते मंडळी प्रयत्न करत असताना आज झालेल्या या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
यावेळी उमेश कोरगावकर, सुरेश भोगटे, सावंतवाडी शिवसेनेचे शहराध्यक्ष शैलेश गवंढळकर , बंड्या तोरस्कर उपस्थित होते. आमदार वैभव नाईक व माझी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या भेटीमुळे शहरात चर्चेला उधाण.

