🟥 दोडामार्ग तालुक्यात आढळला दुर्मिळ जातीचा साप उडता सोनसर्प..
*🟥 सर्प इंडिया टीम चे प्रकाश नाईक, रोहन कदम आणि राहुल ठाकूर यांनी केला रेस्क्यु..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-२० :-* दोडामार्ग तालुक्या मध्ये प्रथमच दुर्मिळ जातीचा साप उडता सोनसर्प – Ornate Flying Snake ( chrysopelea ornata ) रेस्क्यू करण्यात आला. सर्प इंडिया टीम चे रेस्क्युअर प्रकाश नाईक, रोहन कदम आणि राहुल ठाकूर यांनी हा साप रेस्क्यु केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे गावातून एका घरात साप असल्याचा कॉल सर्प इंडिया टिमच्या सभासदांना आला होता. त्यानंतर सर्प इंडिया टीम चे रेस्क्युअर प्रकाश नाईक त्याच बरोबर रोहन कदम आणि राहुल ठाकूर यांनी त्याठिकाणी उपस्थित होते. त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हा साप पकडण्यात सोपा नव्हता तरी रोहन आणि प्रकाश यांनी टीम वर्क ने काम करून हा साप रेस्क्यू केला. सुरक्षित रित्या हा साप पकडला व वनविभागाला सूचितकेल्या नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केला.
सामान्यपणे उडणारे साप फार कमी आढळतात. हैराण करणारी बाब ही आहे की, फार जास्त विषारी नसूनही या सापांबाबत भीती फार जास्त आहे. पण या सापांना पंख नसूनही उडतात कसे? असा प्रश्न अनेकांना नेहमीच पडतो. वैज्ञानिकांनी या प्रश्नाचं उत्तर शोधलं आहे. ताज्या
रिसर्चनुसार, हे साप एका खास हालचालीच्या माध्यमातून उडू शकतात अशी माहिती सर्प इंडिया टीमचे चित्रा पेडणेकर यांनी दिली.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

