चौकुळ मध्ये साठ वर्षीय शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला; हल्ल्यात शेतकऱ्याचा पाय जायबंदी
▪️सलग दुसऱ्या दिवशी अस्वलाच्या आल्याने गावात दहशतीचे वातावरण..
▪️वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा; गावकऱ्यांची मागणी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : केशव जाधव, चौडू पाटील
🎴आंबोली,दि.३१: येथील चौकुळ बेरडकी खायले सरोवर येथे बुधाजी नाईक या साठ वर्षिय शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याने त्यांचा उजवा पाय जायबंदी झाला आहे. त्यांना उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज संध्याकाळी चारच्या सुमारास बुधाजी नाईक (वय वर्ष ६०) हे आपल्या गुरांना घेऊन बेरडकी खायले सरोवर येथे गेले होते. समोरून अस्वल येत असल्याचे दिसताच ते झाडावर चढले. मात्र, अस्वलाने त्यांच्या पायाला चावा घेऊन खाली खेचले. त्यावेळी सोबत गुरे घेऊन असणाऱ्या विष्णू नाईक यांनी आरडा-ओरड केली. त्यावेळी अस्वल व अस्वलाचे चे पिल्लू जंगलात पळून गेले. त्यानंतर बुधाजी नाईक यांना उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांच्या पायाला टाके घालण्यात आले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी चौकुळ मध्ये अस्वलाने हल्ला केल्याने गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
*_🔥फ्री होम डिलिव्हरी ती ही फक्त सावंतवाडी शहरापुरती मर्यादित..🔥_*
*🍝 शिवन्या फास्टफूड 🍜*
कोविड-19 च्या काळात आमच्या सर्व ग्राहकांसाठी सावंतवाडीत आम्ही पुन्हा एकदा सुरू करीत आहोत. *फ्री होम डिलिव्हरी* सुविधा आणि ती ही पूर्णपणे सुरक्षित..
🍢गोबी मंचुरी ₹25/-
🥘फ्लॉवर चिल्ली ₹40/-
🥟स्टीम मोमो ₹20/-
*_🤷🏻♂️खायला येणार कुठे? त्यासाठी आमचा पत्ता आहे,_*
हॉटेल मँगो 1 समोर, सावंतवाडी..
*_🙋🏼♂️मग वाट कसली पाहताय! उचला फोन आणि करा कॉल.._*
*_📱9404931801_*
*_📱9146144203_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

