अफाट कर्तुत्व अंगी असलेला कर्णा सारखे दाणशूर व्यक्तीमत्व म्हणजेच -सुधीर आडिवरेकर
*🟥अफाट कर्तुत्व अंगी असलेला कर्णा सारखे दाणशूर व्यक्तीमत्व म्हणजेच -सुधीर आडिवरेकर*
*🟥 वेळ प्रसंगाला धावणारा सुधीर, सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदी विराजमान व्हावा हीच युवा वर्गाची इच्छा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे*
*🎴 सावंतवाडी, दि.:४ जुलै*
गोरगरीब जनतेच्या वेळ प्रसंगाला कॉलेज जीवनापासून धावून जाणारा, प्रत्येकाच्या अडचणीच्या प्रसंगात मदतीला धावणारा, हक्काचा माणूस म्हणजे युवा नेतृत्व सुधीर आडिवरेकर, जे का रंजले गांजले, त्याची म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, या निळा आकाशाच्या अतिव्याप्त छायेखाली खाली परमेश्वर निर्मित जे जे येतं त्यात गोष्टीला आपलेसे करून घेण्याची कुवत सुधीर आडीवरेकर यांच्या मध्ये आहे, करणा सारखे दानशूर व्यक्तिमत्व सुधीर यांच्या जवळ असल्याने वेळ प्रसंगाला हक्काचा माणूस म्हणून प्रत्येक जणांच्या मुखात सुधीर आडीवरेकर यांचे नाव येते हा माणूस राजकारणात ओघाने आला असला तरी मुळात त्याचा राजकारण हा पिंड नाही.
कोणताही कार्यक्रम असो तो भव्य ,दिव्य ,झाला पाहिजे हा त्याचा नेहमी हट्ट असतो,मात्र कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर आजपर्यंत त्याच्या श्रेय त्याने कधीच घेतले नाही,ते श्रेय तो आपल्याच नेत्याला देतो, त्यामुळे सुधीर आडीवरेकर शहराध्यक्ष, सभापती, या पदांपर्यंत पोहोचू शकला, त्याचे ही धडपड पाहता तो सावंतवाडीचा नगराध्यक्ष होईल यात माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही.
उभा बाजार परिसरच नव्हे तर संपूर्ण सावंतवाडी शहरात सुधीर आडिवरेकर यांना मानणारा युवा वर्गांचा एक मोठा गट त्याच्यासोबत आहे, व्यायाम पटूना मार्गदर्शन, लागेल ती मदत, करण्याची वृत्ती यामुळे एखाद्या कार्यकर्त्याला पोलिसांनी जरी पकडले तरी तो कार्यकर्ता मी सुधीर आडिवरेकर यांचा कार्यकर्ता असे पोलिसांना अभिमानाने सांगतो आणि त्या पोलिसाला सुधीर आडीवरेकर कोण हे माहिती नसेल तरी पण तो मुलगा ज्या अविर्भावात सुधीर यांचे नाव घेतो त्यामुळे कर्तव्य बजावत असलेल्या त्या पोलिसाला सुधीर आडिवरेकर ही कोणी तरी मोठी व्यक्ती असावी असे वाटते व तो पुन्हा असे करू नकोस असे सांगून त्याला जाण्यास सांगतो ही ताकद सुधीर आडवेकर यांची आहे .
अनेक वेळी, अनेक प्रसंगात, मी जेव्हा सुधीर आडवेकर यांना फोन केला, तेव्हा त्यांनी एकच सांगितले की गावडे साहेब तुम्ही तुमचा लढा चालू ठेवा माझी संपूर्ण ताकद तुमच्या सोबत आहे,मी तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असा विश्वास दिला.
एवढ्या मोठ्या मनाचा सुधीर भविष्याचा वेध घेतोय, अफाट इच्छा शक्ती व कर्तृत्व अंगी असलेल्या सुधीरचे पाय आजही जमिनीवर आहेत, हे नसे थोडके, त्याच्या कर्तुत्वाला दातृत्वाला माझा सलाम, आणि श्री देव पाटेकर व 365 खेड्यांचा रखवालदार सर्वांना संरक्षण कवच देणारा उपरलकर तसेच सावंतवाडी संस्थांचा ब्राह्मण, यांनी आमचे युवा मित्र सुधीर आडिवरेकर यांना सावंतवाडी शहराच्या मानाच्या खुर्चीवर म्हणजेच नगराध्यक्षपदावर बसवावे अशी त्यांच्या जवळ प्रार्थना. व माझी कुल देवता आई तुळजाभवानी ने त्याच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा परिपूर्ण कराव्यात हीच प्रार्थना.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

